ज्ञानवापी मशीद प्रकरणामुळे देशात मागील काही दिवसांपासून वातावरण तापलेले आहे. याच प्रकरणावर आज वाराणसी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये न्यायाधीश मुस्लिम तसेच हिंदू पक्षाची बाजू जाणून घेतील. या प्रकरणाशी निगडित एकूण तीन याचिका दाखल करण्यात आल्या असून दोन्ही पक्षांनी वेगवेगळी मागणी केलेली आहे.
हेही वाचा >>> अमरनाथ यात्रेपूर्वी दहशतवादी संघटनेचे धमकीचे पत्र; आरएसएस आणि केंद्र सरकारवर निशाणा
दोन पक्षांनी केल्या आहेत वेगवेगळ्या मागण्या
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार लक्ष्मी देवी, राखी सिंह, सीता साहू, मंजू व्यास तसेच रेखा पठक या पाच महिलांनी हिंदू पक्षातर्फे याचिका दाखल करुन काही मागण्या केल्या आहेत. तसेच मुस्लिम पक्षातर्फे अंजुमन इंतेजामिया मशीद समितीने दुसरी याचिका दाखल केली आहे. या दोन्ही पक्षांमार्फत वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >>> “अनेक देशांत निर्बंध उठवलेत, परिस्थिती सामान्य झाल्यासारखं वाटतंय पण…”; WHO च्या प्रमुखांचा करोनासंदर्भात नवा इशारा
हिंदू पक्षाने कोणती मागणी केली आहे
हिंदू पक्षाने श्रृगांर गौरीची रोज पूजा करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच वझुखानामध्ये मिळालेल्या कथित शिवलिंगाची पूज करण्यास अनुमती देण्यात यावी, नंदीच्या उत्तरेस असलेली भिंत तोडण्यात यावी, वझुखानामध्ये आढळलेल्या कथित शिवलिंगाची लांबी तसेच रुंदी मोजण्यासाठी सर्वेक्षण केले जावे, वझुखानाची वैकल्पिक सोय करावी, अशा मागण्या हिंदू पक्षाने आपल्या याचिकेत केल्या आहेत.
हेही वाचा >>> रस्त्यावरील नमाज पठणाबाबत योगी आदित्यनाथ यांचं विधान; म्हणाले “ईदच्या दिवशी रस्त्यावर…”
मुस्लिम पक्षाच्या काय मागण्या
मुस्लिम पक्षानेदेखील काही मागण्या केल्या आहेत. वझुखाना बंद करण्यास मुस्लीम पक्षाने विरोध केला आहे. तसेच १९९१ अधिनियमाअंतर्गत ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण तसेच खटल्यावर या पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हेही वाचा >>> समाजवादी पक्षात फुटीची चर्चा ; आझम खान, शिवपाल यांची बैठकीकडे पाठ
दरम्यान, ज्ञानवापी मशीद प्रकरणातील गुंतागुंत आणि संवेदनशीलता लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाने, हिंदू भाविकांनी दाखल केलेला दावा शुक्रवारी दिवाणी न्यायाधीशांकडून (वरिष्ठ) काढून तो वाराणसी जिल्हा न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी हस्तांतरीत केला होता. त्यानंतर आता या प्रकरणाची जिल्हा न्यायाधीशांकडे सुनावणी सुरु आहे.