वाराणसीतल्या ज्ञानवापी परिसरातल्या व्यासजी तळघरात अखेर ३१ वर्षांनी पूजा करण्यात आली. तसंच आज सकाळीच अनेक लोक या ठिकाणी पूजा करण्यासाठी पोहचले आहेत. ज्ञानवापी परिसरातल्या असलेल्या व्यास तळघरात पहाटे दोन वाजता पूजा आणि आरती करण्यात आली. ३० वर्षांनी ही घटना घडली आहे. आम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन केल्याचं भक्तांचं म्हणणं आहे. तसंच वाराणासी जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर बॅरिकेडही हटवण्यात आले आहेत. ३१ जानेवारी या दिवशी न्यायालयाने हिंदू पक्षकार ज्ञानवापी परिसरात पूजा अर्चा करु शकतात असा आदेश दिला होता. हा आदेश म्हणजे मोठा दिलासा आहे असं हिंदू पक्षकारांनीही म्हटलं होतं. या आदेशानंतर पहाटे दोन वाजता व्यासजी तळघरात पूजा करण्यात आली.

मुस्लीम पक्षकार वरच्या कोर्टा जाणार

मुस्लीम पक्षकारांनी जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाला वरच्या न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू पक्षकारांचे वकील मदन मोहन यादव यांनी पीटीआयला सांगितलं की जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेस यांनी व्यासजी तळघरात पूज करण्याचा अधिकार असल्याचा आदेश दिला आहे. त्यानंतरच इथे पूजा आणि आरती करण्यात आली. या तळघरात असलेल्या मूर्तींची पूजा आणि आरती करण्यासाठी न्यायलयाने सात दिवसांची मुदत दिली होती. मात्र त्याच्या आतच या ठिकाणी पूजा आणि आरती करण्यात आली.

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!

जितेंद्र नाथ व्यास यांनी काय म्हटलं आहे?

आम्हाला पूजा अर्चा करण्याचा अधिकार मिळाला याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. ज्ञानवापीच्या तळघरात आम्ही पूजा केली. देवाची पूजा आणि आरती करण्याचा अधिकार आम्हाला मिळाला आहे. व्यास कुटुंबीय आणि पाच पूजारी उपस्थित होते. तसंच आयुक्तही उपस्थित होते. त्या सगळ्यांच्या उपस्थितीत आम्ही तळघरात पूजा आणि आरती केली असं जितेंद्र नाथ व्यास यांनी सांगितलं. जितेंद्र नाथ हे व्यास कुटुंबातले आहे. त्या ठिकाणी काशी विश्वनाथाचं मंदिरच आहे. ते स्वयंभू मंदिर होतं आहे आणि राहिल. तुम्ही ते झाकलंत तरीही ते मंदिरच आहे. भिंतींवर स्वस्तिक, कमळ यांच्या आकृत्या आहेत. हे हिंदू मंदिरच आहे असंही जितेंद्र नाथ व्यास यांनी म्हटलं आहे.

वाराणसी न्यायालयाने बुधवारी हिंदू भाविकांना ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात प्रार्थना – पूजा करण्याचा अधिकार बहाल केला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार हिंदू भाविक ‘व्यासाचे तळघर’ (व्यास का तहखाना) मध्ये पूजा करू शकतात. सध्या मशिदीतील हा भाग बंद ठेवला गेलेला आहे. जिल्हा प्रशासनाने पुढील सात दिवसांत हिंदूंना त्याठिकाणी पूजाअर्चा करण्याची व्यवस्था करून द्यावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

हे पण वाचा- ज्ञानवापी मशीद प्रकरणात आतापर्यंत काय घडले? जाणून घ्या…

या निकालानंतर हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, व्यासाचे तळघर येथे हिंदूंना पूजाअर्चा करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. आता जिल्हा प्रशासनाने सात दिवसांच्या आत तिथे व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून तिथे प्रत्येकाला पूजा करण्याची संधी मिळेल. यानिर्णयानंतर हिंदू पक्षकारांनी न्यायालयाबाहेर आनंद व्यक्त केला.

Story img Loader