लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरला हॅकर्सनी लक्ष्य केलंय. हॅकर्सनी ट्विटरवरील सुमारे अडीच लाख अकाऊंट्सचे पासवर्ड आणि अन्य माहिती हॅक केली असल्याचा खुलासा ट्विटरने शुक्रवारी रात्री उशीरा केला.
ट्विटरने आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे की, हॅकर्सनी पासवर्ड चोरल्यानंतर आम्ही ते रिसेट केले असून, संबंधितांना याबाबत कळविण्यात येते आहे. शुक्रवारी चीनमधील काही हॅकर्सनी वॉल स्ट्रीट जर्नलमधील वार्ताहरांचे कॉम्प्युटर हॅक केल्याची माहिती पुढे आली होती. त्याआधी न्यूयॉर्क टाइम्सचे कॉम्प्युटरही हॅक करण्यात आले होते. ट्विटरवरील अकाउंट कोणत्या देशातून हॅक झाले, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही सर्व अकाऊंट हेतुपूर्वक हॅक करण्यात आली होती. कोणत्याही नवशिक्याचे हे काम नक्कीच नाही, असे या ब्लॉगमध्ये लिहिण्यात आले आहे. अमेरिकी सरकार आणि पोलिसांच्या मदतीने हॅकर्सचा शोध घेण्यात येतो आहे, असे ब्लॉगवर लिहिण्यात आले आहे. ट्विटवर सध्या सुमारे २०० मिलियन अकाऊंट्स आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा