पाक व्याप्त काश्मीरमध्ये आलेल्या पुरातही मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला दहशतवाद दिसला आहे. काश्मीरमधील पूर हा भारताने केलेला दहशतवादी हल्ला असल्याचे वक्तव्य हाफिजने केले आहे.
भारतीयांचे विचार संकुचित – हाफिज सईद
पाक व्याप्त काश्मीरमध्ये आलेल्या पूरसंकटाचे निमित्त करून हाफिजने पुन्हा वादग्रस्त वक्तव्यातून भारतावर निशाणा साधला. भारताने कोणतीही पूर्वसुचना न देता काश्मीरमधील धरणांचे पाणी पाकिस्तानातील नद्यांमध्ये सोडले आणि पाकिस्तानला पूराबाबत खोटी माहती देण्यात आली यामुळेच निरपराधांचे प्राण गेल्याचा आरोप यावेळी हाफिजने केला आहे. सोबत लडाख येखील धरण प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास इस्लामाबादला याचा जास्त धोका निर्माण होऊ शकतो असेही हाफिज पुढे म्हणाला.

Story img Loader