हाफिज सईदला बाळासाहेब ठाकरेंना धडा शिकवायचा होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट मुंबईवरील २६\११ हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या डेव्हिड हेडली याने शनिवारी केला. सध्या हेडलीची टेलिकॉन्फरन्सद्वारे उलट तपासणी सुरू आहे. यावेळी त्याने अनेक खळबळजनक खुलासे केले.

मला बाळासाहेब ठाकरेंना धडा शिकवायचा आहे, असे हाफिज सईदने आपल्याला एकदा सांगितले होते. ही कामगिरी मी सहा महिन्यांत पूर्ण करू शकतो, असे मी त्यावेळी हाफिज सईदला सांगितल्याचे हेडलीने म्हटले. त्यासाठी मी शिवसेना भवन आणि बाळासाहेब ठाकरे राहत असलेल्या मातोश्रीच्या परिसराची रेकी केली होती. मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या सुरक्षारक्षकांबरोबरही मी त्यावेळी बोललो होतो. याशिवाय, आपण टन्ना हाऊस येथील सीबीआयचे मुख्यालय आणि विधिमंडळाची रेकी केल्याचे हेडलीने चौकशीदरम्यान कबुल केले.

तुरुंगातून बाहेर येताच थेट ‘मातोश्री’वर पोहोचला होता संजय दत्त, बाळासाहेबांना मिठी मारली अन्…

इशरत जहाँप्रकरणाबाबत लख्वीने मला सांगितले होते. मात्र, त्यापूर्वी वृत्तपत्रांच्या माध्यमातून मला याप्रकरणाची माहिती होती. मी भारतातील राष्ट्रीय तपास यंत्रणेला(एनआयए) इशरत जहाँबद्दल माहिती दिली होती. मात्र, त्यांनी या माहितीची नोंद का घेतली नाही, हे मला माहित नाही. मी एनआयएला लष्कर-ए-तोयबातील महिला शाखेविषयी सांगितले असल्याचे सांगत हेडलीने बचावपक्षाच्या वकिलांचा दावा फेटाळून लावला.

Story img Loader