‘जमात उद दवा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा कट रचणारा हाफीज सईद राजस्थान सीमेलगच्या पाकिस्तानच्या हद्दीतील गावांचा दौरा करताना आढळून आला आहे.
गुजरातमधील मुस्लिमांपेक्षा पाकिस्तानात हिंदू अधिक सुरक्षित – हाफिज सईद
भारत-पाक सीमेलगतच्या सिंध सेक्टरमधील पाकिस्तानच्या हद्दीतील इस्लामकोट, मिरपूर खास आणि खानपूर गावांमध्ये हाफीज सईद फिरताना आढळून आल्याने तो पाकिस्तानात असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सईद हा राजस्थान सीमेलगतच्या पाकिस्तानच्या हद्दीतील गावांमध्ये दोन दिवस थांबला होता.
विशेष म्हणजे या गावांमध्ये हिंदू कुटुंबियांचे वास्तव्य आहे. तेथील गावकऱयांना सईदने रोकड, गुरेढोरे आणि भांड्यांचे वाटप केले आणि भारताबद्दल गावकऱयांमध्ये द्वेषाची भावना निर्माण करण्याचे काम केल्याचे समजते. त्याचबरोबर गावकऱयांवर दहशतवादी प्रशिक्षणात मुलांना पाठविण्यासाठी सईदकडून दबाव आणला जात असल्याचीही माहिती समोर आली आहे.
दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूंवर हल्ल्याची हाफिजची धमकी
‘मोस्ट वॉण्टेड’ दहशतवादी हाफीज सईद राजस्थानच्या सीमेजवळ!
'जमात उद दवा' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा कट रचणारा हाफीज सईद राजस्थान सीमेलगच्या पाकिस्तानच्या हद्दीतील गावांचा दौरा करताना आढळून आला आहे.
First published on: 04-07-2014 at 02:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hafiz saeed tours pakistan villages near rajasthan border report