एकीकडे तीन दिवस आधीच केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं आहे. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये आज अचानक हवामानामध्ये बदल झालेला पाहायला मिळाला. दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या पावसामुळे येथील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. तसेच हवाई वाहतुकीवरदेखील याचा परिणाम झाला. दिल्ली शहरासह गुरगाव आणि दिल्लीजवळच्या परिसरात वादळी पावसाची नोंद झाली.

हेही वाचा >>> मुख्यमंत्रिपदाबाबत सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान, म्हणाल्या “ते मी…”

दिल्लीमध्ये सायंकाळी साधारण ४.३० वाजता हवामानामध्ये बदल झाला. आकाशात काळे ढग जमा झाले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह गारपिटीला सुरुवात झाली. गारपिटीमुळे दुचाकीस्वारांना तसेच चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणे अवघड होऊन बसले. काही ठिकाणी तर झाडेदेखील उन्मळून पडली आहेत. पाऊस, वादळी वारा तसेच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे काही फोटो सध्या दिल्लीकरांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

हेही वाचा >>> Rajyasabha Election : …त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केला – जयंत पाटलांनी केला खुलासा!

आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. यामध्ये कार, ऑटो रिक्षा तसेच अनेक दुचाकींचे नुकसान झाली. संसदेकडे जाण्याच्या रस्त्यावर एका कारवर एअर कडिशन पडले. ज्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा >>> राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल होणार, शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये तापमानात मोठी वाढ झालेली आहे. उकाड्यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. मात्र आज झालेल्या या वादळी पावसामुळे दिल्लीतील तापमान घसरले. पलाम भागात १३ अंशांनी तापमानात घट झाली. तर सफदरगंज फरिसरात १६ अशं सेल्सिअसने तापमानात घट झाली. सफदरगंज परिसरातील तापमान ४० अंशावरुन थेट २५ अंशापर्यंत घसरले.

Story img Loader