इस्रायल आणि पॅलेस्टाईनची संघटना हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला दहा दिवस झाले आहेत. या युद्धात आत्तापर्यंत चार हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली डिफेन्स फोर्सचं म्हणणं आहे की १९९ लोकांना हमासने ओलीस ठेवलं आहे. सुरुवातीला ही संख्या १२० होती. मात्र आता ही संख्या वाढली आहे. इस्रायलने ओलीस ठेवण्यात आलेल्या या लोकांना सोडवण्याची तयारी केली आहे. अशात इस्रायली लेखक युवाल हरारी यांचं म्हणणं आहे शांतता प्रस्थापित होईल असं वातावरण हमासने संपवलं आहे.

काय म्हटलं आहे युवाल हरारी यांनी?

हमास ही संघटना जे काही करते आहे त्यामुळे निरपराध पॅलेस्टाईनी लोक कचाट्यात सापडले आहेत. हमास जोपर्यंत आहे तोपर्यंत गाझा पट्टीत शांतता प्रस्थापित होणं अशक्य आहे.

Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
buldhana protest against home minister amit shah
अमित शहांचा पुतळा जाळला…राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरी जमलेल्या आंदोलकांनी…
Rahul Gandhi
Rahul Gandhi : भाजपा खासदाराचा राहुल गांधींवर धक्काबुक्की करुन पाडल्याचा आरोप, स्पष्टीकरण देत म्हणाले, “मला संसदेत…”
opposition angry over Amit Shahs controversial statement about dr babasaheb ambedkar
‘बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान’, अमित शहांच्या वादग्रस्त मुद्यावर विरोधक संतप्त
Nagpur issue of Massajog Sarpanch Santosh Deshmukhs murder case Dhananjay Munde
Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना राजकीय आश्रय मिळतोय का? धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण
Image of Priyanka Gandhi with Palestine bag.
Priyanka Gandhi : “लाज वाटते एकाही पाकिस्तानी खासदाराने…,” पाकिस्तानच्या माजी मंत्र्याने का केले प्रियंका गांधींचे कौतुक?
Dhananjay Munde On Chhagan Bhujbal
Dhananjay Munde : छगन भुजबळांच्या नाराजीवर धनंजय मुंडेंचं मोठं विधान; म्हणाले, “अजित पवार स्वत:…”

युवाल हरारी यांनी काय म्हटलं आहे?

“इस्रायल-हमास प्रकरणाचा एका बाजूने विचार करुन चालणार नाही. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. सध्या निर्माण झालेली परिस्थिती का झाली आहे? याचाही विचार होणं आवश्यक आहे. इस्रायली असो किंवा पॅलेस्टाईनी हमासकडून माणुसकीचा विचार मुळीच केला जात नाही. इस्रायली असो किंवा पॅलेस्टाईनी ती माणसंच आहेत. मात्र शांतता प्रस्थापित होण्याच्या सगळ्या शक्यता हमासने संपवल्या आहेत. माणसाला किती वेदना होऊ शकतात याचा विचार हमासकडून मुळीच केला जात नाही.” एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हरारी यांनी हे भाष्य केलं आहे.

हे पण वाचा- इस्रायलच्या जन्माची कथा : ‘ज्यू’ पॅलेस्टाईनच्या भूमीत का आले?

७ ऑक्टोबरला पॅलेस्टाइनी संघटना हमासने गाझा पट्टीतून इस्रायलवर हल्ला केला. हमासने त्यावेळी साधारण ५ हजार रॉकेट चालवले होते. इस्रायली लोकांना त्यांच्या घरात घुसून ठार करण्यात आलं. अनेकांची घरं जाळली, माणसांना, स्त्रियांना ओलीस ठेवलं. इस्रायलने या हल्ल्याची तुलना अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या हल्ल्याशी केली आहे.

याबाबत हरारी म्हणतात, “या युद्धातून हमासच्या हाती काहीही लागणार नाही. त्यांचं काही भलं होणार नाही. हमास त्यांच्या कृतीमुळे जगाला संकटात टाकू इच्छितो. त्यांना असं वाटतं आहे की आपण हे सगळं केल्याने जगात चांगल्या गोष्टी घडतील पण असं काहीही होणार नाही.” असंही हरारी यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “जर आमच्या भाळी मरणच लिहिलं असेल, तर…”, यूएनच्या गाझा पट्टीतील कर्मचाऱ्याचा भावनिक संदेश व्हायरल!

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जे फोटो शेअर होत आहेत त्यावरही नोआ हरारी यांनी भाष्य केलं आहे. अशा प्रकारचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करुन काय होणार आहे? या सगळ्यांतून फक्त भीती आणि तिरस्कार वाढीला लागेल दुसरं काहीही साध्य होणार नाही. यापेक्षा शांतता कशी प्रस्थापित होईल याचा विचार केला पाहिजे.” असंही हरारी यांनी म्हटलं आहे.

Story img Loader