Israel-Hamas War: दोन दिवसांपूर्वी गाझा पट्टीतून इस्रायलच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणावर रॉकेट हल्ले करण्यात आले. त्यापाठोपाठ हमासचे दहशतवादी मोठ्या संख्येनं इस्रायलमध्ये शिरले आणि त्यांनी खुलेआम कत्तल सुरू केली. असंख्य इस्रायली महिलांचं आत्तापर्यंत अपहरण करण्यात आलं आहे. याची संतप्त प्रतिक्रिया इस्रायलकडून आली असून इस्रायलयनं आता हमासवर प्रतिहल्ला चढवला आहे. गाझा पट्टीमध्ये इस्रायलकडून मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ले आणि रॉकेट डागले जात आहेत. दोन्ही बाजूच्या हल्ल्यांमध्ये आत्तापर्यंत शेकडो नागरिकांचे प्राण गेले आहेत. या युद्धात आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील इस्रायलची मित्रराष्ट्रंही उतरण्याची शक्यता आहे.

लेबेनॉनच्या हिजबुल्लाह या दहशतवादी गटानं रविवारी हमासच्या बाजूने इस्रायलवर रॉकेट हल्ला चढवून आपणही हमाससोबत असल्याचं जाहीर केलं. इस्रायलच्या हवाई दलानं गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इस्रायलवर आता हमास आणि हिजबुलकडून हल्ले होत असताना दुसरीकडे अमेरिकेच्या युद्धनौका इस्रायलच्या दिशेनं सरकू लागल्या आहेत. जगभरातील इतर देशांनीही आपण इस्रायलच्या पाठिशी असून हवी ती मदत करण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे इस्रायलयच्या भूमीवर चालू असणारं युद्ध आता चिघळल्याचं दिसत आहे.

thackeray group criticized pm narendra modi
“पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची काळजी” ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
two militants killed in a joint operation by army and police in jammu and kashmir
दोन दहशतवादी ठार ; काश्मीरमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत घातपाताचा कट उधळला
Pakistani Arrested IN US
Pakistani Arrested : २० वर्षीय पाकिस्तानी तरुणाला अटक, अमेरिकेत ९/११ सारखा मोठा हल्ला घडवण्याचा कट रचल्याच्या आरोपानंतर कारवाई
pakistani army chief asim munir
Kargil War : २५ वर्षांनंतर पाकिस्तान सैन्याने मान्य केली कारगिल युद्धातील भूमिका; लष्करप्रमुख असीम मुनीर म्हणाले, “आमच्या सैनिकांनी…”
women raped in indore
Raped In Indore: महिलेला विवस्त्र करत मारहाण आणि बलात्कार, नृत्य करण्यास भाग पाडले; आरोपी भाजपाशी संबंधित असल्याची काँग्रेसची टीका
Suicide in uttarpradesh
Man Suicide in UP : “आयुष्यात हवं ते करा पण लग्न करू नका” म्हणत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!
Outrage in Israel over hostage killing
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये संताप,नेतान्याहू जबाबदार असल्याचा आरोप; युद्ध थांबवण्याची मागणी

“हे आमचं ९/११”

दरम्यान, इस्रायलच्या संरक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्य अमेरिकेवर ज्याप्रमाणे ९/११ हल्ला झाला, त्याच प्रकारचा हा इस्रायलयवरचा हल्ला असल्याचं सांगण्यात आलं आहे. संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रिचर्ड हेट यांनी यासंदर्भात एका व्हिडीओच्या माध्यमातून निवेदन जारी केलं आहे.

“गेले २४ तास आमच्यासाठी फार कठीण गेले आहेत. असंख्य न भूतो न भविष्यती अशा घटना घडत आहेत. हमासनं काल आमच्यावर हल्ला चढवला. गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही हमासबाबत बोलत आहोत, सांगत आहोत. ते काय आहेत, कसं काम करतात, त्यांना काय हवंय हे आम्ही बोलतोय. त्यांना आमच्या देशाचं पतन हवंय. त्यांनी आमच्यावर समुद्रमार्गे, हवाई आणि प्रत्यक्ष जमिनीवरून हल्ला चढवला आहे”, असं हेट या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.

“त्यांनी लष्करावर नाही, सामान्यांवर हल्ले केले आहेत”

“त्यांनी आमच्या लष्करावर हल्ले केलेले नाहीत. त्यांनी सामान्य नागरिकांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांची संख्या भयंकर आहे. या हल्ल्याला आम्ही तितक्याच कठोरपणे प्रत्युत्तर देणार आहोत. जे काही करणं गरजेचं असेल, ते सगळं आम्ही करू. या हल्ल्याची पद्धत ही फार निष्ठुर आणि पाशवी आहे. एका अर्थाने हे आमचं ९/११ आहे”, असंही हेट यांनी व्हिडीओमध्ये नमूद केलं आहे.