Yahya Sinwar Last Video News: हमासचा म्होरक्या याह्या सिनवार शुक्रवारी सकाळी इस्रायलयी सैन्यानं केलेल्या कारवाईमध्ये मारला गेला. त्याच्या मृत्यूनंतर त्या घटनेचा व्हिडीओ इस्रायलच्या लष्कराकडून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये याह्या सिनवार गंभीर जखमी अवस्थेत एका उद्ध्वस्त घरात सोफ्यावर तुटलेल्या हातानिशी बसल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्याला ठार करण्याच्या काही क्षण आधीचा हा व्हिडीओ असल्याचं स्पष्ट होत आहे. याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर ही युद्धबंदीच्या दिशेने सुरुवात असल्याची प्रतिक्रिया इस्रायलकडून देण्यात आली आहे. याह्या सिनवारच्या मृत्यूनंतरचा प्रसंग एका इस्रायली लष्करी अधिकाऱ्यानं फेसबुकवर शेअर केला आहे.

याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर युद्धबंदीच्या दिशेनं प्रयत्न होतील अशी शक्यता जागतिक स्तरावर वर्तवली जात होती. पण आज सकाळी इस्रायलचे प्रमुख नेत्यानाहू यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर झालेल्या रॉकेट हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. लेबेनॉन, इराक, जॉर्डन व सीरिया या चार देशांनी एकाच वेळी इस्रायलविरोधात मोहीम उघडल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. त्यामुळे याह्या सिनवार याचा मृत्यू ही गेल्या वर्षभरापासून चाललेल्या इस्रायल-हमास युद्धाचा शेवट होता की नव्या युद्धाची सुरुवात? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.

hamas leader yahya sinwar
विश्लेषण: याह्या सिनवारच्या हत्येनंतर गाझामध्ये युद्धविरामाची शक्यता किती? इस्रायलसाठी मोठा विजय?
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Father and son imprisonment, imprisonment beat police,
मुंबई : कर्तव्या बजावणाऱ्या पोलिसांना मारहाण करणे महागात, पिता-पुत्राला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा
Baba Siddiqui murder case, Baba Siddiqui,
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः …या कारणामुळे हल्लेखोरांनी दुचाकी वापरली नाही
Mumbai, murder MNS worker Mumbai,
मुंबई : मनसे कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी सहा जणांना अटक
Sunil Soman Statement on National Defence Pune news
‘आधी देशरक्षण, मगच कुटुंबाकडे लक्ष…’ सेनाधिकाऱ्याच्या या उद्गारांनी जेव्हा भारावतात श्रोते
Hashem Safieddine is the cousin of Hassan Nasrallah.
Israel Target Hashem Safieddine : मारला गेलेला हेझबोलाचा प्रमुख नसराल्लाहनंतर त्याचा उत्तराधिकारी लक्ष्य; इस्रालयकडून हवाई हल्ले सुरूच!
Iran Israel Conflict
“बिन्यामिन नेतान्याहू २१ व्या शतकातील हिटलर”, इराणच्या भारतीय राजदूतांची टीका; भारताकडे मागितली मदत!
Hamas Leader Yahya Sinwar Killed in Marathi
हमासचा म्होरक्या याह्या सिनवार हा इस्रायलच्या हल्ल्यात ठार (फोटो – इस्रायल लष्कराच्या एक्स हँडलवरून साभार)

इस्रायली सैनिकाची पोस्ट व्हायरल

दरम्यान, याह्या सिनवार मारला गेल्यानंतर एक इस्रायली लष्करी अधिकारी त्याच्या मृतदेहाजवळ काही क्षण एकटाच थांबला होता. त्यानं स्वत: आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये यांदर्भात माहिती दिली आहे. यावेळी याह्या सिनवारच्या निष्प्राण देहाकडे पाहून काय वाटलं, हे या अधिकाऱ्यानं आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. लेफ्टनंट कर्नल इतमार एतम असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्यानं लिहिलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

“एक लहान, विचित्र आणि अस्ताव्यस्त देहाकृती”

“मी आत्ताच राफाह (याह्या सिनवार मारला गेला ते ठिकाण) सोडलं. त्या प्रसंगाला काही फार वेळ नाही झाला. मी सिनवारकडे पाहिलं. त्याच्या गतप्राण डोळ्यांत पाहिलं. मला त्याच्या निष्प्राण देहासोबत काही क्षण एकटंच थांबावं लागलं होतं. तेव्हा मी त्याला पाहिलं.. एक छोटी, विचित्र आणि अस्ताव्यस्त झालेली देहाकृती…एका उद्ध्वस्त झालेल्या सोफ्यावर पडलेली होती”, असं एतम यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Video: रक्ताळलेला हात घेऊन उद्ध्वस्त घरातल्या सोफ्यावर धुळीत बसलेला याह्या सिनवार! हमासच्या म्होरक्याचा ‘असा’ झाला अंत!

“हा माणूस असंख्य माणसांच्या वेदनांसाठी कारणीभूत ठरला. मी त्या उद्ध्वस्त झालेल्या शहराकडे पाहिलं. मला त्यांच्यासाठी प्रचंड वाईट वाटलं. पण या कशाहीपेक्षा मला प्रत्यक्ष त्या इश्वराचा अवमान झाल्यासारखं वाटलं. कारण हा माणूस स्वत: कधीतरी एक लहान मूल होता. त्याच्याकडेही पर्याय होते. पण त्यानं वाईटाची निवड केली. त्यानं विक्षिप्तपणा निवडला. तो एक माणूस होता हाच त्या माणूसपणाच्या प्रतिमेचा केवढा मोठा अपमान होता. आता हे जग कितीतरी पटींनी चांगलं वाटतंय. आम्ही संभ्रमात राहणार नाही आणि हार तर अजिबात मानणार नाही. आपण सगळे एकत्र विजयी होऊ”, अशा शब्दांत लेफ्टनंट कर्नल एतम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

याह्या सिनवार ७ ऑक्टोबर २०२३ च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड!

इस्रायलच्या हद्दीत गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून प्रवेश करत बेफाम कत्तल केली. घराघरात घुसून इस्रायली नागरिकांना ठार केलं. प्रचंड दहशत निर्माण केली. रस्त्यावर मृतदेहांची जाहीर विटंबनाही केली. याह्या सिनवार हा याच हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. त्यामुळे त्याचा मृत्यू हा हमाससाठी मोठा धक्का मानला जातो.

याह्या अचानक सापडला आणि मारला गेला!

हमासचा म्होरक्या इतक्या सहज हाती लागेल याची इस्रायली लष्कराला कल्पनाही नव्हती. तो कुठे आहे याचा ठावठिकाणा लष्कराला माहिती नव्हता. त्याबाबत कोणतीही गुप्तचर यंत्रणेची माहिती लष्कराकडे नव्हती. नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत असणाऱ्या पथकाला तो त्या घरात दिसला आणि त्याचा खात्मा करण्यात आला. पेट्रोलिंगच्या पथकाला हमासचे तीन दहशतवादी दिसले. त्यातच याह्या एक होता. चकमकीदरम्यान याह्यानं एका इमारतीमध्ये आसरा घेतला. पण तिथे इस्रायलचे ड्रोन पोहोचले आणि त्याला ठार करण्यात आलं.