Hamas chief Yahya Sinwar : इस्रायल आणि पॅलेस्टाईनी संघटना हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला एक वर्ष झालं आहे. इस्रायलने गाझा पट्टीतले हल्ले वाढवले आहेत. गुरुवारी इस्रायली लष्कराने हमासचे अड्डे हेरुन त्यावर एअर स्ट्राईक म्हणजेच हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात हमासचा प्रमुख याह्या सिनवार ( Hamas chief Yahya Sinwar ) याचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येते आहे. इस्रायल लष्कर IDF ने याबाबत पुष्टी दिलेली नाही तसंच हमासनेही याबाबत भाष्य केलेलं नाही.

IDF नेमकं काय म्हटलं आहे?

आम्ही हमासच्या तीन दहशतावाद्यांना लक्ष्य केलं होतं. त्यापैकी एक हमासचा म्होरक्या याह्या सिनवार ( Hamas chief Yahya Sinwar ) असू शकतो. सध्या कुठले दहशतवादी मारले गेले आहेत त्यासंदर्भातली ओळख पटलेली नाही. मात्र शक्यता आहे की हमासचा म्होरक्या याह्या सिनावरचा यामध्ये मृत्यू झाला. IDF ने जे पत्रक जारी केलं आहे त्यात हा उल्लेख करण्यात आला आहे. तसंच इस्रायलच्या लष्कराने असंही म्हटलं आहे की आम्ही ज्या इमारतीवर हल्ला केला तिथे दहशतवादी लपले होते तिथे कुणालाही ओलीस ठेवलं गेल्याची चिन्हं दिसत नव्हती.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
MLA Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? पोलिसांवर दबाव आहे का? संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
Sanjay shirsat marathi news
मंत्री संजय शिरसाट यांचा रोख अब्दुल सत्तारांवर
Ajit Pawar responded to opposition objections on evm machine despite mahaviaks aghadi Lok Sabha loss
लोकसभा निकालानंतर ‘ईव्हीएम’ला दोष देत बसलो नाही, अजित पवार यांची विरोधकांवर टीका

रॉयटर्सने काय म्हटलं आहे?

दरम्यान इस्रायलच्या सुरक्षा मंत्रालयाने ही माहिती दिली आहे की हमासचा म्होरक्या याह्या सिनवार ( Hamas chief Yahya Sinwar ) बहुदा मारला गेला आहे. तसंच दोन अधिकाऱ्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेलाही ही माहिती दिली की आमच्या लष्कराने जो हल्ला केला त्यात हमासचा प्रमुख याह्या सिनावर मारला गेल्याची चिन्हं आहेत. KAN आणि N12 या इस्रायलच्या प्रसारमाध्यमांनीही हमासचा म्होरक्या ठार झाला आहे असं वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!

एअर स्ट्राईकमध्ये मारला गेला हमासचा म्होरक्या?

यरुशलेम पोस्टच्या वृत्तानुसार इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्याने हे सांगितलं की गाझा पट्टीमध्ये असलेल्या हमासच्या ठिकाणांवर आम्ही एअर स्ट्राईक केला. त्यामध्ये हमासचा म्होरक्या याह्या सिनवार हा मारला गेला असण्याची दाट शक्यता आहे. आम्हाला तीन दहशतवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. त्यापैकी एक मृतदेह याह्या सिनवारचा असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. DNA चाचणी झाल्यानंतर याबाबत काय ते स्पष्टपणे सांगता येईल असंही IDF ने स्पष्ट केलं आहे.

याह्या सिनवार कोण आहे?

याह्या सिनवारने त्याच्या आयुष्याची २२ वर्षे तुरुंगात घालवली आहेत. १९८८ ते २०११ अशा प्रदीर्घा कालावधीत तो इस्रायलच्या तुरुंगात होता. त्यानंतर काही काळ त्याने अज्ञातवासात घालवला. त्यामुळे तो आणखी कट्टर झाला. तुरुंगात असताना त्याचा प्रभाव इतर कैद्यांवर होता. गैरवर्तन करणं, दादागिरी करणं, हेराफेरी करणं हे त्याच्या स्वभावात होतं. त्याच्याबाबत माहिती देणाऱ्या कैद्यांबाबत त्याने फक्त संशय आल्याने त्यांना शिक्षा देण्याचाही प्रयत्न केला. तसंच तुरुंगात असताना त्याने १६०० कैद्यांना उपोषण करायला लावलं होतं. हिब्रू या भाषेत त्याने प्राविण्य मिळवलं आहे. त्याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सिनवारला गाझा पट्टीतल्या हमास या संघटनेच्या राजकीय सदस्यपदी निवडण्यात आलं होतं. २०१५ मध्ये सिनवारचं नाव जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत आलं. २०१७ पासून त्याने हमासचा म्होरक्या म्हणून काम केलं आहे.

Story img Loader