इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासमधील युद्धाचा आज १८ वा दिवस आहे. हमासने २२० हून अधिक नागरिकांना ओलीस ठेवून आता इस्रायलशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला, इस्रायलनेही हमासच्या मुसक्या आवळण्यासाठी संपूर्ण गाझा पट्टीची नाकेबंदी केली आहे. गाझा पट्टीतला पाणीपुरवठा, वीज आणि इंधनपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे हमास आता इस्रायलने गाझा पट्टीच्या बंद केलेल्या सेवा सुरू व्हाव्यात यासाठी वाटाघाटी करत आहे. हमासने दुहेरी नागरिकत्व असलेल्या ५० ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायलकडे इंधन पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. परंतु, इस्रायलच्या सरकारने ही मागणी फेटाळली आहे. सर्व २२० ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात इंधन पुरवठा सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, असं इस्रायलच्या सरकारने म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर शेपणास्रं डागून युद्धाला सुरुवात केली होती. क्षेपणास्रं हल्ल्यामुळे इस्रायलच्या सीमा भागात अनागोंदी माजली. या अनागोंदीचा फायदा घेत हमासचे दहशतवादी इस्रायलची सीमा ओलांडून रहिवासी भागात घुसले आणि त्यांनी इस्रायली नागरिकांची कत्तल सुरू केली. शेकडो नागरिकांच्या कत्तलीनंतर त्यांनी २०० हून अधिक इस्रायली महिलांचं अपहरण केलं. त्यामुळे इस्रायलनेही गाझा पट्टीत आणि पॅलेस्टाईनवर क्षेपणास्रं डागली. तेव्हापासून हे युद्ध सुरू आहे. अद्याप २२० हून अधिक नागरिक हमासच्या ताब्यात आहेत. हमासने यांना ओलीस ठेवलं आहे. या ओलिसांना सोडवण्यासाठी इस्रायलसह रेड क्रॉस ही आंतरराष्ट्रीय संस्थादेखील प्रयत्न करत आहे.

दुसऱ्या बाजूला, हमासच्या मुसक्या आवळण्यासाठी इस्रायलने संपूर्ण गाझा पट्टीची मानवतावादी मदत बंद केली आहे. इस्रायलने गाझा पट्टीचा पाणीपुरवठा, इंधन आणि वीजपुरवठा बंद केल्यामुळे गाझात राहणाऱ्या सामान्य नागरिकांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. दी टाईम्स ऑफ इस्रायलने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने वृत्त जारी केलं आहे की, इस्रायल आणि हमासमध्ये ५० ओलिसांना सोडण्याबाबत इजिप्तच्या माध्यमातून बातचीत सुरू आहे.

हे ही वाचा >> इस्रायल-हमास युद्धावर बराक ओबामांनी पहिल्यांदाच केलं भाष्य; नेतान्याहूंना इशारा देत म्हणाले, “तुमच्या या…”

काही स्थानिक वृत्तपत्रांनी दावा केला आहे की, सर्व २२० ओलीस एकट्या हमासच्या ताब्यात नाहीत. ३० हून अधिक ओलीस हे पॅलेस्टिनी इस्रामिक जिहाद या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात आहेत. इस्रामिक जिहादचे दहशतवादीदेखील ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होते. हमासप्रमाणे इस्रामिक जिहादच्या दहशतवाद्यांनीदेखील इस्रायली स्त्रियांचं अपहरण केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hamas in talk with israel to release 50 hostages with dual citizenship in for fuel supply asc
Show comments