गेल्या आठवड्यात पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना ‘हमास’ने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांत युद्ध पेटलं आहे. हमासच्या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचा जीव गेल्यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली. इस्रायलने हमासचं प्रमुख केंद्र असणाऱ्या गाझा पट्टीवर जोरदार हवाई हल्ले केले आहेत. यामध्ये हमास दहशतवाद्यांसह अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला. यानंतर आता इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धभूमीतून मोठी माहिती समोर आली आहे.

इस्रायलच्या संरक्षण दलाने शनिवारी सांगितलं की, त्यांनी गाझा पट्टीमध्ये रात्रभर केलेल्या हवाई हल्ल्यात हमास या दहशतवादी संघटनेच्या एका वरिष्ठ सदस्याचा खात्मा केला आहे. इस्रायल संरक्षण दलाच्या हवाल्याने ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायल संरक्षण दलाने केलेल्या हल्ल्यात हमासच्या हवाई गटाचा प्रमुख मुराद अबू मुराद ठार झाला आहे. इस्रायल संरक्षण दलाने हमासच्या मुख्यालयाला लक्ष्य केलं होतं. यावेळी दहशतवादी संघटनेचे सदस्य हवाई हल्ल्याची योजना आखत होते.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: शत्रूचे सत्य समोर आणण्यासाठी तुळजाने केला प्लॅन; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Video Shows Man cleverness
थरारक! काही सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं असतं; ‘तो’ रस्ता ओलांडत असताना वेगानं आली कार अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO
Muramba
Video: एकीकडे माही रमाचे रूप घेणार, तर दुसरीकडे रमा जिवंत…; ‘मुरांबा’ मालिकेत नवीन वळण
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Israel Hamas War reuters
इस्रायल-हमासमधील युद्ध आज थांबणार? कतारचे मध्यस्थीचे प्रयत्न; युद्धबंदीसाठी प्रस्ताव
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?

हेही वाचा- “शत्रूशी लढण्यासाठी सर्व ताकद वापरू”, नेतान्याहूंचा हमासला थेट इशारा; म्हणाले, “ही फक्त…”

मृत अबू मुराद याने गेल्या आठवड्यात हमासकडून इस्रायलवर झालेल्या हवाई हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हमासच्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यात त्याचा मोठा सहभाग होता. हँग ग्लायडरच्या मदतीने इस्रायलमध्ये प्रवेश करण्याची कल्पनाही अबू मुरादची असल्याचं ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

हेही वाचा- चीनमध्ये इस्रायली राजदूताला चाकूनं भोसकलं, थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

खरं तर, शनिवारी (७ ऑक्टोबर) हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात शेकडो लोक मरण पावले. गेल्या दशकातला इस्रायलवरील हा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यात आतापर्यंत इस्रायलमधील १३०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. तर इस्रायलच्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १५३० हून अधिक लोक मारले गेले आहेत. इस्रायलमध्ये सुमारे १५०० हमास दहशतवादी मारल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

Story img Loader