गाझापट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यातील मानवतावादी युद्धविरामाचा शेवट तसेच ओलिसांची व कैद्यांची अदलाबदल झाल्यानंतर इस्रायलकडून पुन्हा एकदा गाझापट्टीवर बॉम्बहल्ले करण्यात आले. दरम्यान युद्धविरामाच्या काळात जगभरातून गाझातील नागरिकांसाठी जी मदत पाठविली गेली होती, त्यावर हमासच्या दहशतवाद्यांनी डल्ला मारला असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायल संरक्षण दलाने (Israel Defence Forces – IDF) रविवारी एक्स या सोशल मीडिया साईटवर एक व्हिडिओ पोस्ट करून हमासवर मदत चोरल्याचा आरोप केला. हमासने सामान्य नागरिकांना मारहाण करून गाझामध्ये पाठविलेली मानवतावादी मदत पळवून नेली असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. गाझामधील सामान्य नागरिकांच्या गरजा पुढे करून हमास दहशतवादी मनसुबे पूर्ण करत असल्याचाही आरोप इस्रायलने केला आहे.

आयडीएफने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही लोकांना मारहाण होत असल्याचे दिसत आहे. तसेच काही लोक मदतीसाठी आलेल्या व्हॅनमधून सामान काढून आपल्या गाडीत भरत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये इस्रायलने लिहिले की, हमासच्या दहशतवाद्यांनी मानवतावादी मदत पळवून नेली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी ही मदत गाझामध्ये पाठविली होती. गाझातल्या सामान्य लोकांना पुढे करून अशाप्रकारे हमास दहशतवादी कारवायांसाठी रसद मिळवत आहे.

Hamas-Israel armistice in Gaza after 15 months of intense war
हमास-इस्रायल दरम्यान गाझात युद्धविराम… पश्चिम आशियात आता तरी शांतता नांदेल?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
police reaction on saif ali khan attack
“त्याच्या गृहसेविकेबरोबर वाद…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
israel hamas agree to ceasefire conflict in gaza to end after 15 months
इस्रायल-हमास युद्धविरामास सहमती; १५ महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार
Israel Hamas War reuters
इस्रायल-हमासमधील युद्ध आज थांबणार? कतारचे मध्यस्थीचे प्रयत्न; युद्धबंदीसाठी प्रस्ताव
Nashik Rural Local Crime Branch arrested burglary and loot gang
हरसूल, त्र्यंबकेश्वर भागात घरफोडी करणारी टोळी ताब्यात
Amit Shah Slams Uddhav Thackeray
Amit Shah : अमित शाह यांची टीका, “सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने…”

दरम्यान आयडीएफने सांगितले की, गाझामधील अल-मवासी हा मानवतावादी परिसर म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. सामान्य लोकांना युद्धाची झळ बसू नये, यासाठी ही तरतूद केली आहे. मात्र हमासचे दहशतवादी गाझाला युद्धाच्या आगीत ढकलत आहेत. हमासने मानवतावादी परिसरातून अनेक रॉकेट्स डागले आहेत. या रॉकेट्समुळे गाझातील सामान्य लोकांसमोर आणखी धोका निर्माण झाला आहे.

हमासकडून इस्रायली लष्करावर हल्ला करण्यासाठी शाळा आणि मशिदीचा वापर करण्यात येत आहे, असेही आयडीएफने शनिवारी सांगितले. तसेच हमासकडून पायाभूत सुविधांचा वापर करून इस्रायली सैनिकांवर हल्ला केला जात आहे. दरम्यान आयडीएफचे प्रवक्ते डॅनिअल हगारी म्हणाले की, गाझापट्टीतील हमासच्या अनेक सैनिकांनी इस्रायली लष्करासमोर शरणागती पत्करत आत्मसमर्पण केले आहे. या सैनिकांकडून हमासची गुप्त माहिती इस्रायली लष्काराला मिळत आहे. इस्रायलविरोधात हमासकडून कशापद्धतीने छुपा हल्ला केला जातो, याचीही माहिती या सैनिकांकडून मिळवली जात आहे. आत्मसमर्पण केलेल्या सैनिकांनी त्यांचे शस्त्र आणि इतर उपकरणे इस्रायलच्या ताब्यात दिली आहेत.

हगारी पुढे म्हणाले, आत्मसमर्पण केलेल्या हमासच्या सैनिकांकडून महत्त्वाची गुप्त माहिती हाती येत आहे. हमासला जमिनीवरून प्रतिकार करण्यास अनेक अडचणी येत आहेत. मात्र हमासचे नेतृत्व हे सत्य स्वीकारण्यास तयार नाही. हमासचे दहशतवादी मैदानावर इस्रायली आक्रमणाला तोंड देत असताना हमासचे नेते मात्र भूमिगत झालेले आहेत. त्यांचा कोणताही संपर्क होत नाही, अशी बातमी टाइम्स ऑफ इस्रायलने दिली आहे.

हमासच्या भूमिगत झालेल्या नेत्यांना गाझामधील सामान्य लोकांची पर्वा नाही. हे सामान्य लोक जमिनीवर मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. या सर्व घडामोडींमुळे हमासच्या दहशतवाद्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, असेही हगारी पुढे म्हणाले.

Story img Loader