हमास या दहशतवादी संघटनेनं ७ ऑक्टोबरला इस्रायलवर अनपेक्षितपणे दहशतवादी हल्ला केला. गाझा पट्टीतून अनेक दहशतवादी जमीन आणि हवाई मार्गानं इस्रायलमध्ये घुसले. पण, हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये ठिकठिकाणी प्राणघातक सापळे रचले होते. ही स्फोटके आणि शस्त्रे गोळा करण्याचं काम इस्रायलकडून केलं जात आहे. याचा एक व्हिडीओ इस्रायलनं शेअर केला आहे.

इस्रायलच्या आयडीएफचा ( अभियांत्रिकी विशेष दल ) एक चमू स्फोटके आणि शस्त्रे गोळा करण्याचं काम करत आहे. इस्रायली अधिकाऱ्यानं सांगितलं, “हमासच्या दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी सापळे रचले होते. ते हटवण्याचं काम केलं जात आहे.”

Bomb attack on Benjamin Netanyahu's house, Israeli Prime Minister's residence targeted.
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बॉम्बहल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, “शत्रूंनी….”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
Jammu And Kashmir
Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील सैन्याच्या गोळीबारात ट्रेकर्स सापडले; गोळीबार थांबवत सैनिकांनी केली सुटका
Congress city presidents strength for rebellion in Thane
ठाण्यात बंडखोरीला काँग्रेस शहराध्यक्षांचे बळ?
jammu Kashmir Kishtwar district encounter
Jammu-Kashmir Encounter: दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद, तर तीन जवान जखमी
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत

हेही वाचा : रस्ते अडवले, कारमधील नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार; हमासनं केलेल्या हल्ल्याचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

हमासच्या दहशतवाद्यांनी नासधूस आणि नागरिकांवर अत्याचार केलेल्या परिसराची साफसफाई करण्याचं काम सुरू आहे. या परिसरात अजूनही शस्त्रं आणि मृतदेह पडलेले आहेत. हे मृतदेह स्फोटकांनी झाकलेले आहेत. या स्थितीत मृतदेह बाहेर काढताना स्फोट होण्याचा धोका आहे. त्यामुळे आयडीएफच्या चमूकडून सावधगिरीनं काम करण्यात येत आहे.

हेही वाचा : इस्रायलकडून रात्रभर हवाई हल्ले, ३० पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू, क्रूर हल्ले थांबवण्यासाठी इराणशी चर्चा

यासंबंधीचा एक व्हिडीओही इस्रायलनं ‘एक्स’ अकाउंटवर शेअर केला आहे. त्यात आयडीएफ एका मुलाच्या शाळेची बॅग तपासताना दिसत आहे. ही बॅग शेतात आढळून आली. त्यात रिमोट कंट्रोलनं नियंत्रित करण्यात येणारे स्फोटक होते. या स्फोटकाचं वजन ७ किलोच्या आसपास आहे. ही बॅग कुठल्यातरी नागरिकानं उचलली तर स्फोट होईल, असा हसामचा डाव होता.