हमास या दहशतवादी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर अनपेक्षितपणे रॉकेट हल्ले केले. यानंतर हवाई आणि सीमावर्ती भागातून हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले आहे. या दहशतवाद्यांकडून इस्रायली नागरिकांवर अत्याचार सुरू असून, अनेकांना ओलिस ठेवल्याचं समोर आलं आहे. अशातच इस्रायली पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात इस्रायल पोलिसांनी हमासच्या दहशतवाद्यांवर गोळ्या झाडल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर इस्रायली पोलिसांनी व्हिडीओ शेअर केला आहे. यात दहशतवादी कारमधून पळून चालले असून, सीमावर्ती पोलीस आणि इस्रायली पोलीस त्यांचा पाठलाग करताना दिसत आहेत. दुचाकीवरील पोलीस दहशतवाद्यांवर पाठीमागून गोळ्या झाडत आहेत. नंतर पुढे कार थांबल्यावर पोलिसांनी दहशतवाद्यांवर गोळ्या झाडल्या. त्यात दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : महात्मा गांधी यांनी पॅलेस्टाईनमधील ज्यू लोकांच्या देशाला विरोध का केला होता?

इस्रायली पोलिसांनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “पोलीस आणि सीमावर्ती पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी नेटिवोट येथे दोन सशस्त्र दहशतवाद्यांना ठार मारलं आहे. दहशतवाद्यांपासून आमच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही काम करत राहू.”

दरम्यान, इस्रायल आणि हमासच्या युद्धात १६०० जणांचा मृत्यू झाला आहे. गाझाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ७०५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १४३ मुले आणि १०५ महिलांचा समावेश आहे. तर, ४ हजार जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा : मुंबईपेक्षाही लहान असलेली ‘गाझा’पट्टी गेल्या १०० वर्षांत युद्धभूमी कशी ठरली?

दुसरीकडे हमासने केलेल्या हल्ल्यात ९०० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, २६०० जण जखमी झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hamas terrorits killed by israeli police in middle road ssa