तालिबानी दहशतवाद्यांविरोधात सातत्याने आवाज उठवणारे, पाकिस्तानातील लोकप्रिय पत्रकार व जिओ टीव्हीचे संपादक हमीद मीर यांच्यावर शनिवारी चार अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या मीर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. तालिबानींनीच मीर यांच्यावर हल्ला केला असावा असा कयास आहे.
हमीद मीर यांचा सध्या जिओ टीव्हीवरील ‘कॅपिटल टॉक’ हा राजकीय विषयांवरील चर्चासत्राचा कार्यक्रम तुफान लोकप्रिय ठरला आहे.
शनिवारी कराची विमानतळावरून ते कार्यालयाकडे जात असताना येथील नाथा खान पुलावर दोन बाइकवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. या हल्ल्यात मीर जखमी झाले.
नोव्हेंबर, २०१२ मध्येही मीर यांच्या कारच्या खाली बॉम्ब पेरण्यात आला होता. तेव्हापासून ते सातत्याने दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा