हंदवाडा येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या ७२ तासांपासून सुरु असलेली चकमक अखेर आज (दि.३) संपली. या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, आपले ५ जवानही यात शहीद झाले आहेत. तसेच शाम नारायणसिंह यादव हा उत्तर प्रदेशातील जवान यांत गंभीर जखमी झाला आहे.


चकमकीत ठार करण्यात आलेल्या दोनही दहशतवाद्यांचे मृतदेह जम्मू-काश्मीर पोलिसांना सापडले आहेत. त्याच्याजवळून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर हत्यारं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. हे दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य़ असल्याचे निष्पन्न झाले आहे. यांपैकी एक जण पाकिस्तानी नागरिक आहे. मात्र, दुसऱ्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही.

अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागात ही चकमक सुरु असल्याने सुरक्षा रक्षकांसमोर हे मोठे आव्हान होते. दरम्यान, एका स्थानिक नागरिकाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. यामध्ये ३ सीआरपीएफचे जवान तर २ जम्मू-काश्मीर पोलिसांचे जवान शहीद झाले आहेत.

गुरुवारी रात्री उशीरा सुरु झालेली ही चकमक सुरक्षा रक्षकांनी हंदवाडातील बाबगंड आणि क्रालगंड भागात घेराव घातल्यानंतर आज तिसऱ्या दिवशीही सुरु होती. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री एका सीआरपीएफच्या अधिकाऱ्यासह चार सुरक्षा रक्षक शहीद झाले होते. तसेच शुक्रवारी या चकमकीत काही नागरिकही गोळ्या लागल्याने जखमी झाले होते.

Story img Loader