अतुलनीय प्रोग्रामिंग आणि सर्वशक्तिमान तंत्रज्ञान पणाला लावणारा संपर्क क्रांतीचा प्रणेता मार्क झकरबर्गचा आज वाढदिवस! तरुण पिढीच्या गळ्यातला ताईत, प्रतिकूलता, वाद-विवाद यांच्या भोवऱ्यातील एक विवाद्य व्यक्ती, टाइम मॅगेझिनने ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून ज्याला २०१० मध्ये गौरविले, अमेरिकेच्या एकूण आर्थिक उलाढालीमध्ये वयाच्या केवळ सतराव्या वर्षीच मार्कचा तीन टक्क्य़ांचा हिस्सा होता.
खेळता-खेळता वयाच्या बाराव्या वर्षी Atari Basic कोड वापरून घरातल्या घरात वापरण्यासाठी Zucknet नावाचा मेसेजिंग प्रोग्राम तयार करणारा मार्क झकरबर्ग हा आज आपला २९ वा वाढदिवस साजरा करत आहे.
फेसबुकला प्रायव्हसी नाही. आपली माहिती कुठेही जाऊ शकते. तरीदेखील मार्क झकरबर्गची बिझनेस टेक्निक्स, व्यवसाय धोरणं खूप चांगली आहेत, अशी मतमतांतरं पाण्याच्या लाटेप्रमाणे कापत कापत फेसबुकचे शाही जहाज मार्गक्रमण करते आहे.
‘मला वाटतं की, बिझनेसचा एक साधा-सोपा नियम आहे. करायला सोप्या गोष्टींपासून जर तुम्ही सुरुवात केलीत तर तुम्ही खरोखरच खूप लांबचा पल्ला गाठू शकता. आपण कोण आहोत, ते अभिव्यक्त करण्याची एक मुख्य आणि प्रबळ इच्छा लोकांना असते आणि माझ्या मते, ती खूप हलचल उडवणारी असते, असं मार्कचं म्हणणं आहे.
१९ वर्षांचा असताना मार्कने फेसबुक ही सोशन नेटवर्कींग वेबसाइट सुरू केली. तेव्हा त्याला बिझनेसबद्दल फारसं काही ठाऊक नव्हतं. त्यानंतर जवळपास सहा वर्षे अथकपणे एकच एक लक्ष्य ठेवून केलेल्या कोडिंग आणि प्रोग्रामिंगमुळे सारं जग जोडलं गेलंय.
मार्क म्हणतो, एकच गोष्ट मी तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतो आणि सांभाळतो आणि ती म्हणजे माझे ध्येय, माझे मिशन आहे- जगाचा कप्पान्कप्पा खुला करणे- मेकिंग द वल्र्ड ओपन! एकदा मी स्टीव्ह जॉब्स यांची मुलाखत पाहात होतो. त्यामध्ये ते म्हणाले की, ‘अशा प्रकारचं काहीतरी करण्यासाठी तुम्हाला अगदी खरोखरच आणि मनापासून तुम्ही जे करता ते आवडणं फार फार महत्त्वाचं आहे. कारण नाहीतर मग अशा उद्यमाला काही अर्थच उरत नाही..’ फेसबुकसारखी काहीतरी गोष्ट प्रत्यक्षात साकारण्यासाठी जे काम करावं लागतं, त्याची शिकस्त असते. ते काम इतकं अवाढव्य आणि प्रचंड आहे की, तुम्ही जर संपूर्णपणे त्याच्यात स्वत:ला झोकून दिलं नाहीत आणि ते अत्यंत महत्त्वाचं काम आहे असं जर तुम्हाला वाटलं नाही तर इतका वेळ आणि शक्ती त्यावर खर्च करणे हे असयुक्तिक ठरेल.
फेसबुकचा कर्ता मार्क झकरबर्गचा आज वाढदिवस
अतुलनीय प्रोग्रामिंग आणि सर्वशक्तिमान तंत्रज्ञान पणाला लावणारा संपर्क क्रांतीचा प्रणेता मार्क झकरबर्गचा आज वाढदिवस! तरुण पिढीच्या गळ्यातला ताईत, प्रतिकूलता, वाद-विवाद यांच्या भोवऱ्यातील एक विवाद्य व्यक्ती, टाइम मॅगेझिनने ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून ज्याला २०१० मध्ये गौरविले, अमेरिकेच्या एकूण आर्थिक उलाढालीमध्ये वयाच्या केवळ सतराव्या वर्षीच मार्कचा तीन टक्क्य़ांचा हिस्सा होता.
First published on: 14-05-2013 at 03:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday mark zuckerberg