स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गुजरातच्या एका युवकाने त्याच्या कारला ‘हर घर तिरंगा’च्या थीमवर नवा लूक दिला आहे. त्यासाठी या युवकाने २ लाखांचा खर्च केला आहे.
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या जनजागृतीसाठी सुरत ते दिल्ली असा सलग दोन दिवस प्रवास केल्याचे या युवकाने सांगितले आहे. सिद्धार्थ दोषी असे या तरुणाचे नाव आहे. सिद्धार्थने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सोमवारी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त सरकारकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटीही पाठिंबा दर्शवत आहेत. आत्तापर्यंत अनेक स्टार्सनी त्यांचा प्रोफाइल फोटो बदलून तिरंग्याचा फोटो ठेवला आहे. तसेच काहींनी आपल्या घराच्या बाल्कनीत राष्ट्रध्वज फडकवला आहे. अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री कंगना राणावत, दक्षिणेतील सुपरस्टार महेश बाबू, आर माधवनने त्यांच्या समाजमाध्यमांवरील खात्यांचा ‘प्रोफाईल पिक्चर’ तिरंगा ठेवला आहे.
Har Ghar Tiranga: इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर तिरंगा प्रोफाइल पिक्चर कसा टाकायचा? जाणून घ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ च्या ९१ व्या भागातून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन देशवासियांना केले होते. या अभियानाअंतर्गत १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.