‘भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी येथील सभेत ‘हर हर मोदी’ अशी घोषणाबाजी करून भाजपने भगवान शंकराचा अपमान केला आहे. या प्रकाराबद्दल भाजपने माफी मागावी, अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे.
मोदींची वाराणसीमध्ये शुक्रवारी ‘विजय शंखनाद’ सभा झाली होती. यावेळी ‘हर हर नमो'(नरेंद्र मोदी) अशा मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या होत्या.  यावरून ‘सप’चे महासचिव आणि प्रवक्ते रामगोपाल यादव म्हणाले, ”मोदींच्या सभेवेळी ‘हर हर मोदी’ अशा घोषणा देण्यात आल्याने शंकराचा अपमान झाला आहे. हिंदू धर्मात शंकराला देव मानण्यात येते. शंकराबद्दल नागरिकांमध्ये खूप श्रद्धा आहे. मोदींच्या नावाची शंकराबरोबर तुलना करण्यात आल्याने हिंदू धर्मियांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपने याबद्दल बिनशर्त माफी मागायला हवी.”

Story img Loader