निर्भया बलात्कार प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या राजधानी दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आज दिल्लीमधील जोरबाग मेट्रो स्टेशन परिसरात एका तरुणीशी अश्लील वर्तन करण्यात आले आहे. या घटनेची माहिती तरुणीने ट्विटरद्वारे दिली असून एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.
हेही वाचा >>> पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान कानपूरमध्ये तुफान दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज
आजतकने दिलेल्या माहितीनुसार एक तरुणी मेट्रो ट्रेनच्या माध्यमातून जोरबागच्या दिशेना जात होती. यावेळी आरोपीने मेट्रो रेल्वेमध्ये बसल्यानंतर तरुणीला अगोदर पत्ता विचारला. तरुणीने या आरोपीची सुरुवातीला मदत केली. नंतर ही तरुणी जोरबाग स्टेशनवर उतरल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग केला. तरुणी कॅब बुक करण्यासाठी आली असता आरोपी तिच्याजवळ येऊन बसला. तरुणीच्या हातात एक फाईल होती. आरोपी तरुणीच्या फाईलकडे निर्देश करत काहितरी सूचवण्याचा प्रयत्न करत होता. तरुणीने फाईलकडे पाहताच आरपीने तिच्याशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा >>> हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर शाळकरी मुलांचा सामूहिक बलात्कार; आमदाराचा मुलगा सहभागी असल्याची चर्चा
ही घटना घडल्यानंतर तरुणीने एका पोलिस अधिकाऱ्याकडे धाव घेतली. मात्र त्या पोलिसाने दुसऱ्या पोलिसांना ही माहिती देण्यास सांगितले. तरुणीने दुसऱ्या पोलिसांकडे धाव घेत तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी विनंती केली. त्यानंतर आता तरुणीच्या विनंतीवरुन दिल्ली पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळला असून तरुणीने त्याला ओळखलेले आहे. सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
हेही वाचा >>> सोनिया गांधींनंतर प्रियंका गांधी करोना पॉझिटिव्ह; ट्विट करत दिली माहिती
दरम्यान, या घटनेनंतर तरुणीने ट्विट करत तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. आता मला घराबाहेर पडायला भीती वाटत आहेत. मी मागील एका वर्षापासून मेट्रोने प्रवास करत आहे. या घटनेमुळे माझा विश्वास ढासळला आहे, असं या तरुणीने म्हटलंय. दिवसाढवळ्या तरुणीसोबत घडलेल्या या घटनेमुळे दिल्लीमधील महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.