गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने काँग्रेसकडून देण्यात आलेली ऑफर नाकारली आहे. सध्या गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी संपूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. त्यासाठी काँग्रेसकडून भाजपविरोधी गटांना एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने हार्दिक पटेलसमोर पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हार्दिक पटेलला निवडणूक लढवायची असेल तर काँग्रेस त्याला तिकीट देण्यास तयार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भारत सोळंकी यांनी म्हटले होते. मात्र, हार्दिकने काँग्रेसच्या या प्रस्तावाला नम्रपणे नकार दिला आहे. घटनात्मकदृष्ट्या मी निवडणूक लढवू शकत नाही. त्याची काही गरजही नाही. मात्र, भाजपच्या विरोधात सर्वांनी एकटवण्याची गरज आहे. ही निवडणूक केवळ भाजप-काँग्रेस यांच्यापुरती मर्यादित नसून राज्यातील ६ कोटी जनता त्यामध्ये सहभागी होणार आहे, असे हार्दिक पटेलने म्हटले. काही दिवसांपूर्वीच गुजरात सरकारकडून हार्दिकविरोधातील तिरंग्याच्या अपमानाचा खटला मागे घेण्यात आला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा