पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याला लाजपोर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले असून तेथील बराकीबाहेरून  दोन भ्रमणध्वनी, चार्जर आणि दूरध्वनी बॅटरी हस्तगत करण्यात आली आहे. हार्दिक याच्या बराकीबाहेरही एक भ्रमणध्वनी संच मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारी सांयकाळी कारागृहातील अधिकारी नियमितपणे तपासणी करीत असताना त्यांना हार्दिकच्या बराकीबाहेर भ्रमणध्वनीचा एक संच मिळाला. त्यानंतर कसून तपासणी करण्यात आली असता आणखी एक संच, बॅटरी आणि दोन चार्जरही मिळाले, असे कारागृहातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

या संदर्भात एफआयआर नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक व्ही. डी. पाटील यांनी सांगितले. हार्दिकच्या बराकीबाहेर जो दूरध्वनी मिळाला त्याचा वापर हार्दिक करीत असल्याचा आमचा तर्क आहे, असेही पाटील म्हणाले.

 

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik patel issue