गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आज भाजपामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल. दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश करण्याआधीच पटेल यांनी पक्षवाढीसाठी मोठी मोहीम हाती घेणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच स्वत:ला मोदींच्या सैन्यातील शिपाई म्हणत आगामी काळात मोदींच्या नेतृत्वात काम करेन असंदेखील पटेल म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> हार्दिक पटेल १५ हजार कार्यकर्त्यांसोबत करणार भाजपात प्रवेश; ट्विट करत म्हणाले “मी तर मोदींच्या सैन्यातला शिपाई…”

काँग्रेस आमदारांसह तसेच अन्य पक्षातील नाराज नेत्यांना भाजपात सामील करुन घेण्यासाठी पटेल प्रत्येक दहा दिवसांनी एक कार्यक्रम आयोजित करणार आहोत. याबाबत माहिती देताना, “आज मी एक नवा अध्याय सुरु करत आहे. मी एक छोटा शिपाई म्हणून काम करणार आहे. आम्ही प्रत्येक दहा दिवसांनंतर एक कार्यक्रम आयोजित करणार आहोत. यामध्ये काँग्रेस पक्षातील आमदारांसहीत अन्य नाराज नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी विचारणा करण्यात येईल. मोदी हे जगाची शान आहेत,” असे हार्दिक पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “सरकारने दिलेल्या आश्वासनांचे बुडबुडे निरपराध्यांच्या रक्ताने…”; काश्मिरी पंडितांवरील हल्ल्यांवरुन शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

तसेच एकेकाळी पाटीदार समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे भाजपा सरकारवर आगपाखड करणारे हार्दिक पटेल यांनी आज “राष्ट्र, राज्य तसेच लोकहित लक्षात घेऊन मी आज नव्या अध्यायाला सुरवात करणार आहे. मी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशसेवेच्या कार्यमधील एक छोटा शिपाई म्हणून काम करणार आहे,” असे म्हणत भाजपा सरकारवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

हेही वाचा >>> Latest Russia-Ukraine War News : अमेरिकेकडून युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रास्त्र पुरवठा

यापूर्वी हार्दिक पटेल काँग्रेस पक्षात होते. या काळात त्यांनी शेतकरी, पाटीदार समाजाचे आरक्षण अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजपा तसेच नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं होतं. मात्र आत याच मोदी सरकारच्या नेतृत्वात देशसेवेसाठीच्या कार्यात आपण छोटा शिपाई म्हणून काम करु असे पटेल यांनी म्हटलंय. त्यामुळे पटेल यांच्या या प्रतिक्रियेची चांगलीच चर्चा होत आहे.

हेही वाचा >>> सोनिया, राहुल यांना ‘ईडी’ची नोटीस ; ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण काँग्रेसच्या मानगुटीवर, आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

दरम्यान, हार्दिक पटेल यांनी १८ मे रोजी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते आप किंवा भाजपा या दोन पक्षांमध्ये सामील होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आता त्यांनीच आपण भाजपामध्ये सामील होणार आहोत अशी माहिती दिलेली आहे. पटेल मागील दोन महिन्यांपासून भाजपाच्या संपर्कात होते. गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत आज पटेल भाजपात प्रवेश करणार आहेत.

Story img Loader