पीटीआय, अहमदाबाद : गेल्या काही महिन्यांपासून बंडाचे निशाण फडकविणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी अखेर बुधवारी गुजरात प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गुजरातमध्ये वर्षांअखेर विधानसभा निवडणुका होणार असताना काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातो़
हार्दिक पटेल काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचे संकेत गेल्या काही महिन्यांपासून मिळत होत़े प्रदेश काँग्रेस नेत्यांवर जाहीर नाराजी व्यक्त करताना हार्दीक यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाबाबत ममत्व बाळगले होत़े मात्र, त्यांनी बुधवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात प्रदेश काँग्रेस नेत्यांबरोबरच शीर्ष नेतृत्वालाही लक्ष्य केल़े
‘‘गुजरात आणि गुजरातींबद्दल द्वेष असल्यासारखे पक्षाच्या नेतृत्वाचे वर्तन होत़े मी अनेकदा गुजरातमधील समस्यांकडे नेतृत्वाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला़ मात्र, जेव्हा-जेव्हा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून काही मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाइलवर अधिक लक्ष असल्याचे आढळल़े काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे गांभीर्याचा अभाव असल्याचे दिसले’’, अशी टीका करत हार्दीक पटेल यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केल़े देशाला किंवा पक्षाला गरज असताना काही नेते परदेशात मौजमजा करत होते, अशी टिप्पणीही हार्दीक यांनी या पत्रात केली़
काँग्रेसला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला़ मात्र, काँग्रेस केवळ विरोधाच्या राजकारणात अडकला असून, देश आणि समाजहिताविरोधात काम करत आहे, असा आरोपही हार्दीक पटेल यांनी केला़ काँग्रेसवर टीका करताना हार्दीक यांनी अनुच्छेद ३७० हटविण्याच्या मुद्याबरोबरच राम मंदिर, जीएसटीच्या मुद्यावरून भाजपचे कौतुक केले आह़े त्यामुळे हार्दीक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आह़े
‘राजीनामा पत्रात भाजपची भाषा’
हार्दकि पटेल यांनी राजकीय अप्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आह़े राजीनामा पत्रातील त्यांची भाषा ही भाजपची भाषा आहे, असा आरोप काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहील यांनी केला़ ‘‘पाटीदार आरक्षणाच्या आंदोलनावेळी दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यासाठी हार्दीक पटेल हे गेली काही वर्षे भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. आता हे गुन्हे गुजरातमधील भाजप सरकारकडून मागे घेण्यात येत असल्याने पटेल यांनी हे पाऊल उचलले,’’ असा आरोप काँग्रेसचे गुजरात प्रदेश प्रभारी रघू शर्मा यांनी केला.