गुजरातमधील पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारा युवा नेता हार्दिक पटेल याच्या पोलीस कोठडीत अहमदाबाद येथील न्यायालयाने दोन दिवस म्हणजे ३ नोव्हेंबपर्यंत वाढ केली. पटेल याला देशद्रोह आणि सरकारविरुद्ध संघर्ष पुकारल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. यापूर्वी त्याला दिलेल्या सात दिवसांच्या कोठडीची मुदत रविवारी संपत होती. पटेल तपासात सहकार्य करीत नसल्याची तक्रार सरकारी वकिलांनी केली.
पटेलने २५ ऑगस्टला घेतलेल्या सभेनंतर राज्यभरात पाटीदार अनामत आंदोलन समितीतर्फे प्रक्षोभक संदेश पसरवण्यासाठी ‘व्हॉट्सअॅप’ या मोबाइल फोन अॅप्लिकेशनवर ४५२ हून अधिक ग्रुप तयार करण्यात आले होते. त्या सर्व ग्रुप्सच्या अॅडमिनिस्ट्रेटर्सचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत.

Story img Loader