उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी शनिवारी विधानसभेच्या अध्याक्षांची भेट घेऊन काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याच्या मागणीला पाठिंबा दिला.
आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी केल्याबद्दल रावत यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. रावत यांनी विधानसभा अध्यक्ष गोविंदसिंह कुंजवाल यांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले की, संसदीय कामकाजमंत्री इंदिरा हृदयेश यांनी बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी केली असून त्याच्या पुष्टय़र्थ दस्तऐवज सादर केल्याचे सांगितले.
काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी पक्षाचे सदस्यत्व सोडले असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा लागू होतो, त्यामुळे या बंडखोरांना अपात्र ठरवावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा