प्रभू रामचंद्रांची सीतासुद्धा विदेशी होती. भारतीयांनी सीतेला आराध्य दैवत मानले, मग सोनिया गांधी यांच्या विदेशीपणावर आक्षेप का घेतला जातो? असा सवाल उपस्थित करत केंद्रीय जलसंधारण मंत्री हरीश रावत यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची तुलना थेट सीतेशी केली.
रावत म्हणाले, भारतीय परंपरेनुसार, महिलेचा विवाह झाल्यानंतर ती जिथे जाते, तिला तिथलीच रहिवाशी मानले जाते. तसेच तेथील महिलांइतकाच सन्मान दिला जातो. प्रभू रामांची पत्नी सीतासुद्धा मुळची नेपाळची होती. मात्र, रामचंद्रांशी विवाह झाल्यानंतर त्या भारतीय झाल्या. भारतीयांनी सीतेला केवळ आपले मानले नाही, तर दैवताचा दर्जा दिला. त्यामुळे प्रत्येकवेळी सोनिया गांधी यांच्या विदेशीपणावर विरोधकांकडून लक्ष्य केले जाते हे चुकीचे आहे.
मध्यप्रदेश भाजपने विकासकामांच्या प्रचारासाठी परदेशी रस्ते आणि शेतीचे छायाचित्रे वर्तमानपत्रात दिल्या होत्या त्यावर काँग्रेसने भाजपवर कडाडून टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपने सोनियांच्या विदेशीपणाचा मुद्दा पुढे केला होता. या टीका आणि प्रतिटीकांच्या युद्धात हरीश रावत यांनी भारतीयांचे दैवत असलेल्या सीतेशी सोनिया गांधी यांच्याशी तुलना केली.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2013 रोजी प्रकाशित
काँग्रेस नेत्याकडून सोनिया गांधींची सीतेशी तुलना!
प्रभू रामचंद्रांची सीतासुद्धा विदेशी होती. भारतीयांनी सीतेला आराध्य दैवत मानले, मग सोनिया गांधी यांच्या विदेशीपणावर आक्षेप का घेतला जातो?
First published on: 21-11-2013 at 01:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harish rawat compares sonia gandhi with goddess sita