प्रभू रामचंद्रांची सीतासुद्धा विदेशी होती. भारतीयांनी सीतेला आराध्य दैवत मानले, मग सोनिया गांधी यांच्या विदेशीपणावर आक्षेप का घेतला जातो? असा सवाल उपस्थित करत केंद्रीय जलसंधारण मंत्री हरीश रावत यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची तुलना थेट सीतेशी केली.
रावत म्हणाले, भारतीय परंपरेनुसार, महिलेचा विवाह झाल्यानंतर ती जिथे जाते, तिला तिथलीच रहिवाशी मानले जाते. तसेच तेथील महिलांइतकाच सन्मान दिला जातो. प्रभू रामांची पत्नी सीतासुद्धा मुळची नेपाळची होती. मात्र, रामचंद्रांशी विवाह झाल्यानंतर त्या भारतीय झाल्या. भारतीयांनी सीतेला केवळ आपले मानले नाही, तर दैवताचा दर्जा दिला. त्यामुळे प्रत्येकवेळी सोनिया गांधी यांच्या विदेशीपणावर विरोधकांकडून लक्ष्य केले जाते हे चुकीचे आहे.
मध्यप्रदेश भाजपने विकासकामांच्या प्रचारासाठी परदेशी रस्ते आणि शेतीचे छायाचित्रे वर्तमानपत्रात दिल्या होत्या त्यावर काँग्रेसने भाजपवर कडाडून टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपने सोनियांच्या विदेशीपणाचा मुद्दा पुढे केला होता. या टीका आणि प्रतिटीकांच्या युद्धात हरीश रावत यांनी भारतीयांचे दैवत असलेल्या सीतेशी सोनिया गांधी यांच्याशी तुलना केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा