उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत हे काँग्रेसच्या बंडखोर आमदारांसमोर लाच देण्याचा प्रस्ताव मांडत असताना करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशन संदर्भात मंगळवारी त्यांची सीबीआयने चौकशी केली. रावत हे आपल्या समर्थक आमदारांसह सीबीआयच्या मुख्यालयात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रावत यांनी या चौकशीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी केलेली याचिका उत्तराखंड उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्याचप्रमाणे राज्यात राष्ट्रपती राजवट असताना चौकशीचे आदेश देण्यात  आले होते ते रद्द करण्याबाबतची राज्य सरकारची अधिसूचना सीबीआयने गेल्या आठवडय़ात फेटाळली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harish rawat sting operation issue