Haryana Bus Accident : देशभरात दररोज अनेक वेगवेगळ्या अपघाताच्या घटना समोर येत असतात. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचंही पाहायला मिळतं. अनेकदा अपघातांचे फोटो किंवा व्हिडीओही समोर येतात. काही अपघाताचे व्हिडीओ समोर आल्यानंतर अक्षरशः अंगावर शहारे येतात. आता अशाच प्रकारे एक धक्कादायक घटना हरियाणात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरियाणामधील गुरुग्राम टोल प्लाझा या ठिकाणी टोल वाचवण्याच्या प्रयत्नात हरियाणा रोडवेजच्या एका बसच्या चालकाने टोल कर्मचाऱ्याला चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेत जखमी झालेल्या टोल कर्मचाऱ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

व्हिडीओमध्ये असं दिसून येत आहे की, हरियाणा रोडवेजच्या एका बस चालकाने टोल वाचवण्यासाठी टोल बूथमधून जात असताना वेगात बस चालवून टोल गेट कर्मचाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना घडल्यानंतर बस चालक घटनास्थळावरून पळून गेला. ही घटना घडल्यानंतर गुरुग्राम पोलिसांनी बस चालकाचा तपास सुरू केला आहे. त्यानंतर गुरुग्राम पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्या बस चालकाचा तपास सुरू केला आहे.