Haryana Election 2024 BJP MLA Cried on Camara : हरियाणा विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तरी अद्याप अनेक पक्षांचं तिकीटवाटप पूर्ण झालेलं नाही. हरियाणा भाजपाने नुकतीच त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ही यादी आल्यानंतर तिकीट मिळालेले उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसू लागला आहे. तर ज्या इच्छूक उमेदवारांचं व आमदारांचं तिकीट कापलं गेलं आहे त्यांच्या घरी निराशेचं वातावरण आहे. दरम्यान, भाजपाच्या एका आमदाराचं विधानसभेचं तिकीट कापल्यामुळे त्यान टाहो फोडला आहे. तिकीट कापल्यामुळे हा आमदार मोठमोठ्याने रडत असल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

भाजपाने आमदार शशी रंजन परमार यांना यावेळी (हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४) तिकीट दिलं नाही, त्यामुळे शशी परमार मोठमोठ्याने रडू लागले. ते भिवानी जिल्ह्यातील तोशाम मतदरसंघाचे आमदार आहेत. त्यांना यावेळी देखील तोशाम किंवा भिवानी मतदारसंघातून तिकीट मिळेल अशी चर्चा होती. मात्र, भाजपाने भिवानी मतदारसंघातून घनश्याम सर्राफ व तोशाममधून श्रुती चौधरी यांना विधानसभेचं तिकीट दिलं आहे.

LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
sunil tingre connection with Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आमदार टिंगरेंची चौकशी केल्याला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दुजोरा
Devendra Fadnavis Ask Question to Sharad pawar
Devendra Fadnavis : “आपल्या बापाला लुटारु म्हणणारे हे कोण लोक आहेत?”, सूरतच्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Sculptor Jaydeep Apte Comment
Sculptor Jaydeep Apte: ‘घाणेरड्या राजकारणामुळे मी पोलिसांना शरण आलो’, शिल्पकार जयदीप आपटेचा दावा
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका

हे ही वाचा >> Kolkata Rape Case : “माझी लेक म्हणायची…”, कोलकाता प्रकरणातील पीडितेच्या आईचं भावुक करणारं पत्र

भाजपाची विधानसभेच्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये शशी रंजन परमार यांचं नाव नसल्याचं पाहून काही प्रसारमाध्यमांनी परमार यांच्याशी बातचीत केली. यावेळी परमार म्हणाले, “मला वाटत होतं की पक्ष मला तिकीट देईल. पक्ष माझ्या नावाचा विचार करत आहे असं मी लोकांना सांगितलं होतं. आता मी काय करू? हे सगळं माझ्याबरोबरच का होतंय? माझ्याबरोबर पक्षाने जो व्यवहार केलाय ते पाहून मला खूप वेदना होत आहेत. मला कळत नाहीये, पक्षात हे कसले निर्णय घेतले जात आहेत”.

हे ही वाचा >> कुस्तीपटू विनेश व बजरंगचा भारतीय रेल्वेतील नोकरीचा राजीनामा, काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेच्या रिंगणात उतरणार?

हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख पुढे ढकलली

हरियाणा विधानसभेच्या मतदानाची तारीख नुकतीच बदलण्यात आली आहे. याआधी निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार १ ऑक्टोबर रोजी मतदान आणि ४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार होती. मात्र आता ५ ऑक्टोबर रोजी मतदान आणि ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. जम्मू आणि काश्मीरचीही मतमोजणी आता ८ ऑक्टोबर रोजीच होईल, असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.