हरियाणा सरकारने गुरूग्राम येथे सात वर्षांच्या मुलीच्या मृत्यूनंतर पालकांना १६ लाखांचे बिल भरायला सांगणाऱ्या फोर्टिस रुग्णालयाचा भाडेपट्टी करार रद्द केला आहे. हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी हा करार तसेच रुग्णालाचे काही परवाने रद्द करण्याचे आदेशच दिले आहेत. डेंग्यूमुळे मुलीचा मृत्यू झाल्यानंतर धक्का बसलेल्या पालकांना १६ लाखांचे बिल देणाऱ्या रुग्णालयाविरोधात सर्वांनीच राग व्यक्त केला होता. प्रसारमाध्यमांबरोबरच समाजमाध्यमांवर या प्रकरणावर बरीच चर्चा झाली. अखेर हरियाणा सरकारे संबंधित रुग्णालयाचा भाडेपट्टी करार रद्द केला असून रुग्णालयातील रक्तेपेढीचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. याशिवाय बेजबाबदार वागणुकीसाठी रुग्णालयाविरोधात गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. पीडित कुटुंबीयाने या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली होती. संबंधित प्रकरणाच्या चौकशीनंतर या मुलीच्या पालकांना रुग्णालयाने बीलाची रक्कम ७०० टक्क्यांनी वाढवून सांगिल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीनंतरच हरियाणाच्या आरोग्यमंत्र्यांनी हे आदेश दिल्याचे समजते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा