नियोजन आयोगाने सादर केलेल्या अहवालातून महाराष्ट्राचे उद्योग क्षेत्रातील वास्तव समोर आले आहे. उद्योगांना चालना देणाऱया राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा समावेश शेवटच्या पाच राज्यांच्या यादीत करण्यात आला आहे. दुसरीकडे हरियाणा, गुजरात आणि मध्यप्रदेश ही राज्ये उद्योगशील यादीच्या सर्वात वरच्या क्रमांकावर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच आंध्रप्रदेश राज्यही पाचव्या स्थानी आहे.
उद्योगांना पोषक वातावरण आणि उद्योगशील धोरण म्हणून उत्तम राज्यांच्या यादीत पहिल्या पाच राज्यांपैकी दोन राज्यांमध्ये (हरियाणा, आंध्रप्रदेश) काँग्रेसचे सरकार आहे आणि दोन राज्यांमध्ये (गुजरात, मध्यप्रदेश) भाजपचे सरकार आहे. रोजगाराच्या मुद्द्यांवरून इतर राज्यांतून महाराष्ट्रात स्थलांतर होणाच्या कारणावरून अनेक प्रश्न, राजकारण होताना दिसले परंतु, या अहवालाच्या वास्तवानुसार राज्याचे चित्र भलतेच असल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे, बिहार राज्याचाही उद्योगशील राज्यांत सहावा क्रमांक लागला आहे. केरळ, राजस्थान आणि तामिळनाडू राज्ये अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्र राज्य या राज्यांच्याही मागे आहे.