Divya Pahuja Murder case: हरयाणाचा गँगस्टर संदीप गाडोली याचा मुंबईत २०१६ मध्ये एनकाऊंटर झाला होता. आता त्याच्या गर्लफ्रेंडची म्हणजेच मॉडेल दिव्या पाहुजाची गुरुग्रामच्या हॉटेलमध्ये अत्यंत रहस्यमयरित्या हत्या करण्यात आली आहे. या हत्येचं सीसीटीव्ही काही प्रमाणातलं फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. या प्रकरणातल्या मास्टरमाईंडलाही पोलिसांनी अटक केली आहे. तरीही मॉडेल दिव्या पाहुजाच्या मृत्यूचं गूढ कायम आहे.

दिव्या पाहुजाचा मृतदेह अद्यापही गायब

सीसीटीव्ही कॅमेरात जे फुटेज कैद झालं आहे त्यातून ही माहिती समोर आली आहे की मॉडेल दिव्या पाहुजाची हत्या झाली. दिव्या पाहुजा ही दिसायला खूप सुंदर असलेली मॉडेल होती. तिची हत्या झाल्याचे दोन दिवस उलटले आहेत. तरीही पोलिसांना तिचा मृतदेह सापडलेला नाही. तिच्या मारेकऱ्यांनी सगळ्या गोष्टी इतक्या सफाईने केल्या आहेत की पोलिसांनी मास्टरमाईंडला अटक केली असली तरीही मॉडेलचा मृतदेह त्यांना मिळालेला नाही.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा

गँगस्टर संदीप गाडोली गर्लफ्रेंड

गँगस्टर संदीप गाडोलीची दिव्या पाहुजा ही गर्लफ्रेंड होती. ७ फेब्रुवारी २०१६ या दिवशी गँगस्टर संदीप गाडोलीचं एनकाऊंटर झालं. त्यावेळी दिव्या त्याच्याबरोबर तिथे होती. हे एनकाऊंटर मुंबईत झालं असलं तरी ते हरियाणा पोलिसांनी केलं होतं. एनकाऊंटरनंतर दिव्या पाहुजा या प्रकरणातली माफीची साक्षीदार झाली. मात्र दिव्यावर तिच्या बॉयफ्रेंडने म्हणजेच संदीप गाडोलीने पोलिसांची माहितगार असल्याचा आरोप त्याच्या एनकाऊंटरच्या केला होता. त्याच्या या आरोपांमुळेच तिच्या अडचणी वाढल्या अशीही चर्चा आता होते आहे.

२ जानेवारीला काय घडलं?

गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिव्याच्या कुटुंबीयानी २ जानेवारीच्या दिवशी ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. घरातल्यांचं म्हणणं होतं की ती तिच्या आत्ताच्या बॉयफ्रेंडबरोबर म्हणजेच अभिजितसह फिरायला निघाली होती. १ जानेवारीला आमचं बोलणं झालं असं कुटुंबीयांनी सांगितलं होतं. मात्र २ जानेवारी रोजी तिचा फोन नॉट रिचेबल झाला असं तिच्या घरातल्यांनी पोलिसांना सांगितलं. आज तकने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- मॉडेल दिव्या पहुजाची गुरुग्रामच्या हॉटेलमध्ये हत्या; गँगस्टरची हत्या केल्याप्रकरणी भोगला होता कारावास

पोलिसांना कुटुंबाने तक्रार केली.त्यानंतर त्यांनी अभिजितला फोन केला. पण त्याने दिव्याबाबत काहीही सांगितलं नाही. त्यावेळीच काहीतरी गडबड आहे असा संशय दिव्याच्या नातेवाईकांना आला. त्यानंतर त्यांनी सिटी पॉईंट हॉटेल, गुरुग्राम बस स्टँड ही सगळी ठिकाणं तपासली. तसंच हॉटेल कर्मचाऱ्यांकडे १ आणि २ जानेवारीचं सीसीटीव्ही फुटेज मागितलं. त्यावेळी दिव्याच्या नातेवाईकांना फुटेज देण्यास नकार दिला. त्यानंतर गुरुग्राम पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार केली. ज्यानंतर तपासाला वेग आला.

सीसीटीव्ही कॅमेरात समोर आली माहिती

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा त्यांना हे दिसलं की दिव्याचं प्रेत हॉटेलच्या कॉरिडोरमधून खेचून नेलं जात आहे. हे फुटेज २ जानेवारीच्या रात्रीचं होतं. २ जानेवारीच्या सकाळी त्या हॉटेलमध्ये दिव्या पाहुजा पोहचली होती. त्यावेळी तिच्याबरोबर अभिजित आणि इतर दोनजण होते. अभिजित आणि दिव्या खोली क्रमांक १११ मध्ये गेले. ते फुटेज दिव्या जिवंत असल्याचं शेवटचं फुटेज होतं असं पोलिसांनी म्हटलं आहे.

हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर पोलिसांनी हॉटेलचा मालक अभिजितसह तिघांना अटक केली. कारण दिव्याची हत्या त्याच हॉटेलमध्ये झाली जिथे अभिजित तिच्यासह गेला होता. तसंच तिचं प्रेत बाहेर खेचत नेण्यात आलं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून जे फुटेच पाहिलं त्यानंतर अभिजितसह एकूण तिघांना अटक केली. मात्र अद्याप कार आणि तिचा मृतदेह मिळालेलं नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजितने हे मान्य केलं आहे की दिव्याचं प्रेत बाहेर नेण्यासाठी त्याने दोघांना बीएमडब्ल्यू कार आणि १० लाख रुपये दिले होते. आता प्रश्न हा देखील आहे की दिव्याची हत्या का झाली?