“राज्य सरकार संपूर्ण कर्नाल प्रकरणाची चौकशी करेल, असं हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितलं आहे. २८ ऑगस्ट कर्नालमध्ये देण्यात आलेले लाठीचार्जचे आदेश आणि “त्यांची (शेतकऱ्यांची) डोकी फोडा” अशा सूचना देणाऱ्या आयएएस अधिकारी आयुष सिन्हा यांच्यासह संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं अनिल विज यांनी सांगितलं आहे. अनिल वीज म्हणाले की, “आम्ही फक्त आयुष सिन्हा नव्हे तर संपूर्ण कर्नाल प्रकरणाची चौकशी करू. तपासाशिवाय आम्ही अधिकाऱ्यांना शिक्षा करू शकत नाही.” परंतु, यापुढे त्यांनी शेतकऱ्यांना देखील इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वीज म्हणाले की, “जर या चौकशीत शेतकरी नेते दोषी आढळले तर आम्ही त्यांच्यावरही कारवाई करू.” गेल्या महिन्यात कर्नालमध्ये झालेल्या लाठीचार्जविरोधात आंदोलक शेतकरी आणि हरियाणा सरकार यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनिल विज यांनी हे वक्तव्य केलं आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी असं सांगितलं आहे की, “कर्नालमधील या लाठीचार्जमुळे त्यांच्या एक साथीदाराचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १० सहकारी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांनी बुधवारी सांगितलं होतं की, “सलग दुसऱ्या दिवशी देखील राज्य सरकार आणि आमच्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे”

शेतकऱ्यांची डोकी फोडा हे शब्द चुकले पण…; मुख्यमंत्री खट्टर ‘त्या’ अधिकाऱ्याच्या पाठिशी

…आंदोलन दीर्घ करू!

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आपलं आंदोलन दीर्घ करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी टिकैत म्हणाले होते, “सिंघू आणि टिक्री बॉर्डरप्रमाणेच आम्ही इथे देखील दीर्घ काळ निषेध नोंदवू शकतो. आम्ही राज्य सरकारसोबत ३ तास बैठक घेतली. परंतु, सरकार अधिकारी आयुष सिन्हा यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही. म्हणूनच आम्ही आमचा निषेध आणि आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे.”

व्हिडिओ व्हायरल

कर्नालचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) आयुष सिन्हा यांनी पोलिसांना भाजप नेत्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे डोके फोडण्याचे आदेश देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजपाच्या एका बैठकीला विरोध करण्यासाठी जाताना एका महामार्गावरील वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या कारवाईवर अनेकांनी टीका केली. यावेळी आयुष सिन्हा यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला.

“…यासाठी भाजपा एका मोठ्या हिंदू नेत्याची हत्या करेल”, राकेश टिकैत यांचे खळबळजनक आरोप

“हाच ‘सरकारी तालिबान’चा पहिला कमांडर”

टिकैत यांनी यापूर्वी अशी टीका केली होती की, “शेतकऱ्यांचं डोकं फोडण्याची सूचना देणारे कर्नालचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) आयुष सिन्हा हा अधिकारी या ‘सरकारी तालिबान’चा पहिला कमांडर आहे.”यासोबतच राकेश टिकैत यांनी यावेळी कर्नालमधील शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी अधिकाऱ्याविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.