इंडियन नॅशनल लोकदल (INLD) पक्षाचे हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष नफेसिंह राठी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. रविवारी झज्जर जिल्ह्यातील बहादूरगड येथे ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार राठी हे आपल्या एसयूव्हीमध्ये प्रवास करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.

अंगरक्षकांवर रुग्णालयात उपचार

INLD चे प्रवक्ते राकेश सिहाग यांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार राठी यांच्या संरक्षणासाठी असलेल्या तीन खासगी अंगरक्षकांनाही गोळ्या लागल्या आहेत. या अंगरक्षकांवर रुग्णालयात सध्या उपचार चालू आहेत. या गोळीबारात राठी यांच्यासह INLD पक्षाच्या आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Despite success in the assembly elections the future is challenging for Eknath Shinde
विधानसभा निवडणुकीतील यशानंतरही एकनाथ शिंदे यांच्यासाठी भविष्यकाळ आव्हानात्मक? दिल्लीतील ‘महाशक्ती’चा पाठिंबा अजूनही? 
eknath shinde look extreme tiredness during maharashtra cm oath taking ceremony
थकलेल्या देहबोलीला सावरण्याचे आव्हान; झगमगाटातही शिंदेंच्या अस्वस्थतेची चर्चा
devendra fadnavis takes oath as chief minister of maharashtra for the third time
तीन ताल… फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी; शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, पवारांचा सहावा विक्रमी शपथविधी

आरोपींना लवकरात लवकर अटक करू

या घटनेबाबत झज्जरचे एसपी डॉ. अरपीत जैन यांनी प्रतिक्रिया दिली. पोलिसांच्या सीआयए, एसटीएफच्या टीमकडून या घटनेची चौकशी केली जात आहे. आम्ही या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करू, असे जैन यांनी सांगितले.

“कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली”

राठी हे १९९६ आणि २००६ अशा एकूण दोन वेळा बहादूरगडमधून येथून आमदार झाले होते. त्यांच्या या हत्येनंतर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुड्डा यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. या घटनेच्या माध्यमातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती समोर येत आहे. या घटनेनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, हे सिद्ध होते. राज्यात कोणालाही सुरक्षित वाटत नाही, अशी भावना हुड्डा यांनी व्यक्त केली.

जानेवारीत राठी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, जानेवारी २०२३ मध्ये हरियाणा पोलिसांनी माजी मंत्री मांगे राम नुंबेरदार यांचा मुलगा तथा स्थानिक भाजपा नेते जगदीश नुंबेरदार यांच्या आत्महत्येप्रकरणी राठी तसेच इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Story img Loader