शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा हरयाणातील भाजप सरकारचा विचार आहे. राज्यात शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याच्या दृष्टीने काय करावे लागेल, याबाबत चर्चेची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, असे राज्याचे शिक्षणमंत्री रामविलास शर्मा यांनी सांगितले. हे नेमके केव्हा केले जाईल असे विचारले असता शर्मा म्हणाले की, यासाठी शिक्षणतज्ज्ञांची एक समिती नेमली जाईल. पुढील शैक्षणिक वर्षांत याची अंमलबजावणी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader