हरयाणा, उत्तर प्रदेश व कर्नाटकात अटीतटीची लढत
राज्यसभेसाठी शनिवारी होणाऱ्या मतदानात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, कर्नाटक, हरयाणा व मध्य प्रदेशात चुरस आहे. त्यात प्रामुख्याने ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल व ज्येष्ठ वकील आर.के. आनंद यांचे भवितव्य निश्चित होईल.
कर्नाटकमध्ये जनता दल धर्मनिरपेक्ष व अपक्ष आमदारांना लाच देण्याच्या आरोपावरून वाद निवडणूक आयोगापर्यंत गेला. उत्तर प्रदेशात ११ जागांसाठी चुरस आहे. त्यात प्रामुख्याने काँग्रेसचे कपिल सिब्बल व भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून िरगणात उतरलेल्या प्रीती महापात्रा यांच्यात चुरस आहे. बसपकडे त्यांचे दोन उमेदवार विजयी झाल्यानंतर १२ अतिरिक्त मते शिल्लक राहत आहेत. त्यावर सिब्बल यांची मदार आहे. काँग्रेसकडे २९ मते आहेत. सिब्बल यांना विजयासाठी आणखी पाच मतांची गरज आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसने ज्येष्ठ वकील विवेक टंका यांना बसपाच्या पाठिंब्याने विजय मिळेल, अशी अपेक्षा आहे. काँग्रेसला एकच मत कमी पडत आहे. मात्र उत्तर प्रदेशबाबत बसपाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा