Hassan Nasrallah Death Mehbooba Mufti Cancel Election Campaign : लेबनॉनमध्ये पेजर्स आणि वॉकीटॉकीचे स्फोट झाल्याची घटना (१७ आणि १८ सप्टेंबर) रोजी घडली होती. या स्फोटात १८ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता तर दोन हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी इस्रायली लष्कराने लेबनॉनमधील बेरूतमध्ये हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात हेजबोलाचे मुख्यालय उद्ध्वस्त करत हेजबोलाचे प्रमुख हसन नसरल्लाहचा खात्मा करण्यात आला. यानंतर इस्रायल आणि लेबनॉनमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, हेजबोलाचे प्रमुख हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला आहे.

इस्रायलच्या हल्ल्यात हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये निदर्शने झाली आहेत. तसेच जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री तथा पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे आगा सय्यद रुहुल्ला मेहदी यांनी हसन नसरल्लाहच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत एक दिवसांच्या निवडणुकीच्या प्रचार सभा रद्द केल्या आहेत. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. तसेच या संदर्भात मेहबुबा मुफ्ती यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्टही शेअर केली आहे.

Nitin Gadkari on Road Accidents
Nitin Gadkari: ‘मी तेव्हा माझे तोंड लपवतो’, नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना व्यक्त केली खंत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Aba Bagul, Parvati Assembly Constituency,
‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Syria, Abu Mohammad Al Jolani, dictatorship Syria,
विश्लेषण : जिहादीचा बनला प्रशासक… कोण आहे सीरियाचा नवा शासक अबू मोहम्मद अल जोलानी?

हेही वाचा : Israel Hezbollah War : इस्रायलचा हेजबोलावर घाव! हवाई हल्ल्यात दहशतवादी हसन नसराल्लाहचा खात्मा; IDF ची माहिती

दरम्यान, हसन नसराल्लाहने तीन दशकांपेक्षा अधिक काळ हेजबोलाचे नेतृत्व केले होते. इस्रायलच्या हल्ल्यानंतर हेजबोलाने शनिवारी दुपारी (२८ सप्टेंबर) हसन नसराल्लाहच्या मृत्यूची पुष्टी करताच श्रीनगर शहर आणि शेजारील बडगाम जिल्ह्यातील विविध भागांमध्ये शेकडो लोकांनी निषेध करत रस्त्यावर उतरले होते. यावेळी आंदोलकांनी हसन नसराल्लाहची छायाचित्रे घेऊन इस्त्रायलच्या विरोधात घोषणा दिल्या.

हसन नसराल्लाहच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी एक्स (ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत आपल्या एक दिवसांच्या निवडणुकीच्या प्रचार सभा रद्द केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं की, “मी उद्या माझी प्रचाराची मोहीम रद्द करत आहे. लेबनॉन आणि गाझाच्या शहीदांना विशेषत: हसन नसराल्लाहशी एकजुटीने अत्यंत दु:खाच्या आणि अनुकरणीय प्रतिकाराच्या या काळात आम्ही पॅलेस्टाईन आणि लेबनॉनच्या लोकांसोबत उभे आहोत”, असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

हसन नसरल्लाह कोण होते?

हसन नसराल्लाहचा जन्म १९६० साली लेबनॉनमधील बेरूत येथे एका गरीब शिया कुटुंबात झाला. धर्मातील स्वारस्यामुळे त्यांना इराकमधील नजफ येथील शिया सेमिनरीमध्ये शिकण्यास पाठविण्यात आले. ते सेमिनरीमधील सय्यद मुसा सदर यांसारख्या प्रमुख धर्मगुरूंनी प्रभावित होते. १९७५ मध्ये सुरू झालेल्या लेबनीज गृहयुद्धाचा नसराल्लाह यांच्या जीवनावर परिणाम झाला. ते पूर्वी शिया मिलिशियामध्ये सामील झाले आणि त्यानंतर इस्रायल आणि पाश्चात्त्य प्रभावाला विरोध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिजबुल संघटनेत सामील झाले. १९९२ मध्ये, हिजबुलचे तत्कालीन नेते सय्यद अब्बास मुसावी यांची इस्रायली सैन्याने हत्या केली, त्यानंतर नसराल्लाह यांनी या संघटनेचा पदभार हाती घेतला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, हिजबुलने आपली लष्करी क्षमता आणि राजकीय प्रभाव वाढवला आणि लेबनॉनमधील हा सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला. २०१८ च्या संसदीय निवडणुकीत, हिजबुलला ३,४०,००० हून अधिक मते मिळाली. लेबनॉनच्या स्वातंत्र्यानंतर कोणत्याही पक्षासाठी ही मते सर्वाधिक होती. नसराल्लाहच्या नेतृत्वाखाली हिजबुलची लष्करी ताकद बरीच वाढली.

Story img Loader