Hathras Stampede Bhole Baba Breaks Silence : हाथरस येथे स्वयंघोषित धर्मगुरू नारायण साकार उर्फ भोले बाबा उर्फ सूरज पाल सिंह जाटव यांच्या सत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर देशभरातून आयोजक आणि भोले बाबांविरोधात संतापाची लाट उसळली असतानाच नारायण साकार यांनी एक असंवेदनशील वक्तव्य केलं आहे. नारायण साकार म्हणाले, “ही दुर्घटना घडल्यापासून मी खूप चिंतेत आहे. परंतु, जे घडणार आहे, ते कसं टाळता येईल. ज्याने या जगात, या भूमीवर जन्म घेतलाय त्याला एक दिवस जायचंच आहे. भले त्याच्या मागे कोणी असो अथवा नसो. प्रत्येकाला परत फिरायचं आहे.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नारायण साकार यांनी त्यांचे वकील एस. पी. सिंह यांचा विषारी वायूसंदर्भातील दावा खरा असल्याचं म्हटलं आहे. सिंह यांनी दावा केला होता की “सत्संगाच्या कार्यक्रमात कोणीतरी विषारी पदार्थ अथवा वायू फवारला होता. त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाली आणि अनेक भक्त मृत्यूमुखी पडले.” नारायण साकार या दाव्याला दुजोरा देत म्हणाले, “सत्संगात कोणीतरी विषारी वायू फवारल्याची बाब खरी आहे. कोणीतरी आमच्याविरोधात कट रचला आहे. काहीजण आम्हाला बदनाम करू पाहत आहेत. परंतु, माझा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीवर पूर्ण विश्वास आहे.”

हाथरसमध्ये चेंगराचेंगरीची घटना झाल्यापासून नारायण साकार फरार होते, जे आता एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माध्यमांसमोर आले आहेत. नारायण साकार म्हणाले, “प्रत्यक्षदर्शीनी आम्हाला दिलेल्या माहितीनुसार सत्संगाच्या कार्यक्रमात विषारी वायूची फवारणी झाल्याचं वृत्त खरं आहे. यामागे मोठं षडयंत्र आहे. काहीजण माझी बदनामी करू पाहतायत. मात्र या प्रकरणाचा तपास करणारं एसआयटीचं पथक सत्य जगासमोर मांडेल.”

या अहवालासाठी एसआयटीने तब्बल ११९ जणांचे जबाब नोंदवले आहेत. (PC : ANI/PTI)

हे ही वाचा >> हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी ‘भोले बाबा’वर आरोप का नाही? काँग्रेस-बसपा आक्रमक; भाजपा-सपाचा सावध पवित्रा

नारायण साकार काय म्हणाले?

हाथरसमधील चेंगराचेंगरीच्या घटनेचा तपास करणारं एसआयटीचं पथक अद्याप नारायण साकार यांची चौकशी करू शकलेलं नाही. कारण दुर्घटना झाल्यापासून ते फरार होते. दुर्घटनेनंतर दोन दिवसांनी त्यांनी एक निवेदन जारी केलं होतं. या निवेदनाद्वारे त्यांनी चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या त्याच्या अनुयायांना मदत करणार असल्याची घोषणा केली होती. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांची जबाबदारी मी घेईन असंही नारायण साकार यांनी म्हटलं होतं. मात्र या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या कुटुंबियांना गमावलं आहे त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की “आतापर्यंत आम्हाला कोणीही भेटलेलं नाही. भोले बाबा किंवा त्यांच्या आश्रमातील कोणीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही, तसेच आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही.”