Hathras Stampede Updates : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे स्वयंघोषित धर्मगुरू भोले बाबाच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर देशभरातून या सत्संगाचं आयोजन करणारे लोक आणि भोले बाबाविरोधात संतापाची लाट उसळली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. एसयाटीच्या पथकाने तीन दिवसांचा तपास आणि तब्बल १२० हून अधिक लोकांच्या चौकशा केल्यानंतर एसआयटीने ३०० पानांचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात दुर्घटनेची कारणं आणि दुर्घटनेला जबाबदार असलेल्या लोकांची नावं नमूद करण्यात आली आहेत. हा अहवाल हाती पडताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अ‍ॅक्शन मोडवर आहेत. उत्तर प्रदेश सरकारने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसह सहा अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. सर्कल ऑफिसरसह, सिकंदरामाऊच्या तहसीलदारांचाही या निलंबित अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.

२ जुलै रोजी नारायण साकार उर्फ विश्व हरी उर्फ भोले बाबा या स्वयंघोषित धर्मगुरूने आणि त्याच्या अनुयायांनी हाथरस येथे सत्संगाचं आयोजन केलं होतं. स्वतः भोले बाबाने या सत्संगाच्या कार्यक्रमात प्रवचन दिलं. मात्र प्रवचन संपवून तो तिथून निघून जात असताना सत्संगाला आलेल्या भक्तांनी त्याला नमस्कार करण्यासाठी त्याच्या कारच्या दिशेने धाव घेतली. हजारो लोक एकाच वेळी त्याच्या कारच्या दिशेने धावू लागले आणि त्याच वेळी धक्काबुक्की आणि चेंगरांचेंगरी झाली. यात १२१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक होती.

supreme court on cbi in arvind kejriwal bail case
“CBI ची तुलना पिंजऱ्यातल्या पोपटाशी…”, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पुन्हा केली ‘त्या’ उक्तीची आठवण; नेमकं काय घडलं होतं तेव्हा?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
supreme-court-on kolkata rape case
Kolkata Rape Case : “नवा अहवाल सादर करा”, कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे सीबीआयला पुन्हा निर्देश!
article about supreme court s verdict on sub classification of scs and sts
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय की मत? अनुसूचित जाती व जमातींचे उपवर्गीकरण
German Bakery Case Court slams jail administration for denying parole to accused Himayat Beg
जर्मन बेकरी प्रकरण : आरोपी हिमायत बेगला पॅरोल नाकारल्यावरून न्यायालयाने कारागृह प्रशासनाला फटकारले
Sandip Ghosh RG Kar Medical College
Kolkata Rape Case : “आर. जी. कर रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष मोठ्या रॅकेटचा भाग”, सीबीआयचा न्यायालयात दावा!
Constitution of India
संविधानभान: सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र
Sugarcane, Delhi High Court, Supreme Court,
ऊस दराचा लढा दिल्ली उच्च न्यायालयात; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दरम्यान, हाथरस चेंगराचेंगरी प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर गेलं असून सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने ही याचिका स्वीकारली आहे.

एसआयटीच्या अहवालात काय म्हटलंय?

या प्रकरणाचा तपास करून एसआयटीने अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की सत्संगाचं आयोजन करणाऱ्या समितीच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडली आहे. या अहवालातून एसआयटीने प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. या सत्संगाला २ लाखांहून अधिक लोक जमले होते. परंतु, आयोजकांनी केवळ ८०,००० लोकांसाठी परवानगी मागितली होती. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना ८०,००० लोकांसाठी परवानगी देत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे आयोजक आणि प्रशासकीय अधिकारी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, या ३०० पानी अहवालात भोले बाबाचा नामोल्लेखही नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.