Hathras Stampede Updates : हाथरस येथे स्वयंघोषित धर्मगुरू भोले बाबाच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर देशभरातून आयोजक आणि भोले बाबाविरोधात संतापाची लाट उसळली असतानाच न्यायालयाने या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तीन दिवसांचा तपास आणि चौकशा केल्यानंतर एसआयटीने तब्बल ३०० पानी अहवाल सादर केला आहे. २ जुलै रोजी नारायण साकार उर्फ विश्व हरी उर्फ भोले बाबाने व त्याच्या अनुयायांनी हाथरस येथे सत्संगाचं आयोजन केलं होतं. स्वतः नारायण साकारने या सत्संगाच्या कार्यक्रमात प्रवचन दिलं. मात्र प्रवचन संपवून नारायण साकार तिथून निघून जात असताना सत्संगाच्या मंडपात चेंगरांचेंगरी झाली. ज्यामध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक होती.

या प्रकरणाच्या एसआयटी अहवालात म्हटलं आहे की सत्संगाचं आयोजन करणाऱ्या समितीच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडली आहे. तसेच एसआयटीने प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे एसआयटीच्या या अहवालात भोले बाबाच्या नावाचा उल्लेख नाही. या अहवालात ११९ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तपास करणाऱ्या पथकात अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुपम कुलश्रेष्ठ आणि अलीगडच्या आयुक्त चैत्रा यांचा समावेश होता.

Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
maharashtra assembly election 2024 amol kolhe allegations bjp for online cash payment to voters
भोसरीत भाजपकडून ‘ऑनलाइन लक्ष्मी दर्शन’?, कोणी केला हा गंभीर आरोप
Process of house sale by developer without lot Mumbai news
सोडतीविनाच विकासकाकडून घरविक्रीची प्रक्रिया?

दुर्घटनेचं कारण काय?

या अहवालासाठी एसआयटीने तब्बल ११९ जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये सस्तंगासाठी आलेल्या भोले बाबाच्या अनुयायांपासून अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हाथरसचे जिल्हा न्यायदंडाधिकारी आशिष कुमार, पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. एसआयटीच्या अहवालानुसार या सत्संगाच्या कार्यक्रमाला २ लाखांहून अधिक लोक जमले होते. परंतु, आयोजकांनी केवळ ८०,००० लोकांसाठी परवानगी मागितली होती. स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना ८०,००० लोकांसाठी परवानगी देत असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे आयोजक आणि प्रशासकीय अधिकारी अडचणीत सापडले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हेच चेंगराचेंगरीचं प्रमुख कारण असल्याचं अहवालात म्हटलं आहे. दरम्यान, आयोजकांनी येथे एक लाख लोकांची व्यवस्था केल्याचं सांगण्यात आलं आहे.

हे ही वाचा >> Hathras Stampede : “लोक मरत असताना बाबा पळून गेले”, मृताच्या नातेवाईकाने सांगितली कहाणी; म्हणाले, “चेंगराचेंगरी झाल्यावर…”

चेंगराचेंगरीची घटना घडली तेव्हा मंडपाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले आणि घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे जबाबही एसआयटीने नोंदवले आहेत. तत्पूर्वी, उत्तर प्रदेश न्यायिक आयोगाच्या पथकाने हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले होते.