लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एखाद्या स्त्रीसोबत लैंगिक संबंध ठेवल्यास त्याची गणना बलात्कार म्हणून होणार आहे. एका खटल्यावरील निरिक्षण नोंदविताना दिल्ली उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे.
“एखाद्या स्त्रीसोबत तिच्या इच्छे विरोधात व तिच्या सहमती शिवाय शरिरसंबंध ठेवणे भारतीय दंड विधानानुसार बलात्कार आहे. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन जरी शरीरसंबंधासाठी सहमती मिळवली तरी तो बलात्काराच आहे”, असे न्यायमुर्ती आर. व्ही. इसवार यांनी सांगितले.
अभिषेक जैन याच्या विरोधात त्याच्या पत्नीने दाखल  केलेल्या खटल्यावरील निरिक्षण नोंदविताना उच्चन्यायालयाने असे म्हटले आहे. जैनने त्याच्या पत्नीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यासोबत लग्नापूर्वी लैंगिक संबंध ठेवले होते. पत्नीने खटला दाखल केल्यावर त्याने तिच्यासोबत लग्न केले. फेव्रुवारी २०१३ मध्ये राणीबाग पोलिस स्थानकात या महिलेने तक्रार दाखल केली होती. या खटल्यात प्रथम दर्शनी असे दिसून आले की, लग्न केल्यावर पत्नी खटला मागे घेईल. या दबामुळे जैन त्याच्या पत्नीसोबत लग्नाला तयार झाला. लग्नानंतर जैनने तिचा शारिरीक छळ करण्यास सुरूवात केली होती.  

Story img Loader