आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला आपण उपस्थित राहणार नसल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. तब्येत ठिक नसल्यामुळे शपथविधी सोहळ्याला जाणार नसल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.
शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार का, असा प्रश्न विचारण्यात आल्यावर माझी तब्येत ठिक नसल्याचे हजारे यांनी सांगितले. परत हा प्रश्न विचारण्यात आल्यावर आत्ता काही सांगू शकत नाही. माझी तब्येत ठिक नाही, असे उत्तर हजारे यांनी दिले.
केजरीवाल शनिवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत सहा जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अण्णा हजारे माझे गुरू असल्यामुळे त्यांना शपथविधी सोहळ्यासाठी आपण वैयक्तिक आमंत्रण देणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर हजारे यांनी शपथविधी सोहळ्याला जाणार नसल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा