चारा घोटाळ्यात पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेले राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावरील निकाल झारखंड उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला. लालूप्रसाद यादव सध्या रांचीतील कारागृहात शिक्षा भोगत आहेत.
लालूप्रसाद यादव यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने त्याला विरोध केला असून, सीबीआयच्या वकिलांनी आपला युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने याचिकेवरील निकाल गुरुवारपर्यंत राखून ठेवला. चारा घोटाळ्यातील आणखी एक दोषी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांना २५ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे.
सीबीआय न्यायालयाने गेल्या ३० सप्टेंबरला लालूप्रसाद यादव, मिश्रा यांच्यासह ४५ जणांना चारा घोटाळ्यात दोषी ठरवले होते. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्या. प्रवासकुमार सिंग यांनी हा निर्णय दिला होता.