राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या आरोपप्रकरणी येथील कनिष्ठ न्यायालयात केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्याविरुद्धची याचिका प्रलंबित असली तरी केरळ उच्च न्यायालयाने थरूर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास दोन आठवडय़ांची स्थगिती दिली आहे.थरूर यांनी केलेल्या याचिकेवरून न्या. व्ही. के. मोहनन यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया दोन आठवडय़ांसाठी स्थगित करण्याचा अंतरिम आदेश दिला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर प्रलंबित असलेली याचिका रद्दबातल ठरवावी, अशी मागणी थरूर यांनी याचिकेद्वारे केली होती. राष्ट्रगीताचे गायन करण्यासाठी थरूर यांनी कधीही कोणालाही प्रतिबंध केलेला नाही, असा युक्तिवाद थरूर यांच्या वकिलांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा