HDFC Bank Employee Death : HDFC बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप आहे. मंगळवारी ही घटना लखनऊ या ठिकाणी असलेल्या बँकेच्या शाखेत घडली. तिच्या मृत्यू मागे कामाचा अतिताण आहे असं तिच्या सहकारी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. तसंच या संदर्भातले काही मीडिया रिपोर्टही हाच दावा करत आहेत. पुण्यात काही दिवसांपूर्वी EY या कंपनीत काम करणाऱ्या अॅना सबेस्टियनचा मृत्यू झाला होता. त्यामागेही कामाचा अतिताण हेच कारण होतं. आता अशी आणखी एक घटना प्रकाशात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फातिमा सदाफ या महिलेचा मृत्यू

ज्या महिलेचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू ( HDFC Bank Employee Death ) झाला त्या महिलेचं नाव सदाफ फातिमा आहे. ती डेप्युटी व्हाईस प्रेसिडंट म्हणून गोमती नगर या ठिकाणी असलेल्या शाखेत काम करत होती. फातिमा ऑफिसमध्ये खुर्चीवर बसलेली असताना अचानक कोसळली. तिच्या सहकाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तिथे तिला मृत ( HDFC Bank Employee Death )घोषित केलं. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी सदाफ फातिमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

अखिलेश यादव यांनी भाजपावर केला आरोप

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या संदर्भात एक्स या सोशल मीडिया साईटवर हा प्रसंग लिहिला आहे आणि महिलेच्या मृत्यूबाबत ( HDFC Bank Employee Death ) चिंता व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर यावरुन अखिलेश यादव यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपाच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. अशा प्रकारे अचानक महिलेचा मृत्यू होणं ही बाब काळजी करण्यासारखी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. अनेकदा राजकीय नेते निराशाजकन वक्तव्यं करतात त्यामुळे अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांची हिंमत खचते. कामाचा ताण येतो आणि अशा घटना घडतात असंही त्यांनी म्हटलं आहे.

कामाच्या ठिकाणी तणावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

कामाच्या ठिकाणी ताणाचा मुद्दा या घटनेने पुन्हा उपस्थित झाला आहे. कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण असणं, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण न येणं त्यांनी प्रसन्न मनाने काम करावं असं वातावरण असणं हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत. सदाफ फातिमा आणि अॅना सॅबिस्टेयिन यांच्या मृत्यूंमुळे या ऑफिसमधलं वातावरण चर्चेत आलं आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hdfc bank employee death colleagues cite work pressure what happened scj