कोणत्याही व्यक्तीकडील काळा पैसा अगदी सहजपणे पांढरा करून देण्याचा गोरखधंदा देशातील तीन नामांकित खासगी बॅंका करीत असल्याचा आरोप ‘कोब्रा पोस्ट’ने एका स्टिंग ऑपरेशनच्या साह्याने केला आहे. खासगी क्षेत्रातील अग्रगण्य आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक आणि अॅक्सिस बॅंक हा गैरव्यवहार करीत असल्याचा आरोप करण्यात आलाय. ‘ऑपरेशन रेड स्पायडर’ असे या स्टिंग ऑपरेशनला नाव देण्यात आले आहे.
कोब्रा पोस्टच्या वार्ताहरांनी या तिन्ही बॅंकांच्या देशातील विविध शाखांमध्ये जाऊन हे स्टिंग ऑपरेशन केले. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याबाबत तपास करण्यात येत असून, त्यात बॅंकांमध्ये काळा पैसा पांढरा करण्याचे रॅकेट पद्धतशीरपणे राबविले जात असल्याचा दावा करण्यात आलाय. स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ कोब्रा पोस्टच्या वेबसाईटवर ठेवण्यात आले आहेत.
बॅंकेच्या माध्यमातून पैशांचा गैरव्यवहार किंवा अपहार होऊ नये, म्हणून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने घालून दिलेली चौकट या बॅंकांकडून पद्धतशीरपणे मोडीत काढली जाते. प्राप्तिकर कायदा आणि ‘फेमा’चेही उल्लंघन बॅंकांकडून करण्यात येते, असे कोब्रा पोस्टने म्हटले आहे. गैरव्यवहारामुळे या बॅंकांकडील ठेवी आणि त्यांच्या नफ्यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा आरोप कोब्रा पोस्टने केलाय. कोब्रा पोस्टने केलेल्या आरोपांची उच्चस्तरिय चौकशी करण्यात येईल, असा खुलासा आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बॅंकेने निवेदनाद्वारे केलाय.
या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळलेले काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष पुढीलप्रमाणे…
आयसीआयसीआय, एचडीएफसी, अॅक्सिस बॅंक करताहेत काळ्या पैशांचा धंदा; कोब्रा पोस्टचा आरोप
कोणत्याही व्यक्तीकडील काळा पैसा अगदी सहजपणे पांढरा करून देण्याचे काम देशातील तीन खासगी बॅंका करीत असल्याचा आरोप 'कोब्रा पोस्ट'ने एका स्टिंग ऑपरेशनच्या साह्याने केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-03-2013 at 12:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hdfc icici and axix bank are blatantly running nation wide money laundering racket